मुंबई : (Sangli Couple Attack) घराच्या दारात कचरा टाकल्याचा जाब विचारल्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका जिहाद्याने हिंदू पती-पत्नीला ठार मारल्याची घटना सांगलीत घडली होती. स्वातंत्र्यदिनी घडलेल्या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून तिचे पती मृत्यूशी झुंज देत आहेत. मनीषा मोहन केसरेकर असे मृत महिलेचे नाव असून, मोहन नागाप्पा केसरेकर असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी शेजारी राहणारा संशयित आरोपी फरीद अब्दुल शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे.
आरोपी फरीद अब्दुल शेख हा केसरेकर यांच्या शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये एकटाच राहतो. गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून तो केसरेकर यांच्या घरावर बॅटरीचा प्रकाश पाडणे, खिडकीवर दगड मारणे आणि सतत कचरा फेकून असभ्य वर्तणूक करणे अशा गोष्टी करून तो केसरेकर यांना त्रास देत होता. यावरून केसरेकर कुटुंब आणि फरीद यांच्यात वारंवार वाद होत होते. याच कारणावरून फरीद केसरेकर कुटुंबावर मनात राग धरून होता. (Sangli Couple Attack)
एमआयडीसी कुपवाड पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या एफआयआर नुसार, दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ च्या सुमारास मनीषा केसरेकर या घरामागे पाणी गरम करण्यासाठी चूल पेटवत होत्या. त्यावेळी फरीद याने पुन्हा केसरेकर यांच्या घरामागील रस्त्यावर कचरा टाकला. मनीषा यांनी त्याला कचरा टाकल्याचा जाब विचारला असता फरीद त्यांच्याशी भांडू लागला. भांडणाचा आवाज ऐकून पती मोहन केसरेकर हे बाहेर आले. मोहन केसरेकर यांनी फरीदला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, फरीदने चिडून त्यांच्या कानाखाली मारली. मनीषा यांनी जाब विचारताच फरीद रागाच्या भरात स्वतःच्या घरात गेला आणि तेथून हातोडा व चाकू घेऊन आला. (Sangli Couple Attack)
"तुला आता जिवंत ठेवत नाही,"असे म्हणत फरीदने मोहन केसरेकर यांच्या डोक्यात हातोड्याने जोरदार प्रहार केला. यामुळे मोहन केसरेकर हे रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळले. यानंतर फरीदने हातातील चाकूने मनीषा केसरेकर यांच्यावर हल्ला चढवला. मनीषा यांनी जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र फरीदने त्यांना गाठून त्यांच्या डोक्यात आणि पोटात चाकूने ३ ते ४ वेळा खोलवर वार केले. मनीषा या गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळल्या. गल्लीतील नागरिक जमा होताच आरोपी फरीद अब्दुल शेख याने आपल्या सायकलीवरून हातोडा व चाकू घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. (Sangli Couple Attack)
घटनेनंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी पती-पत्नीला तात्काळ रिक्षातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान मनीषा केसरेकर यांची प्राणज्योत मालवली असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर मोहन केसरेकर यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. (Sangli Couple Attack)
सदर प्रकरणी आरोपी फरीद शेख याच्याविरोधात एमआयडीसी कुपवाड पोलीस स्थानकात भारतीय न्याय संहिता अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये कलम १०३(१), १०९(१), ११५(२), ३५१(३) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या आरोपी फरीद शेख पोलिसांच्या ताब्यात असून प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे. (Sangli Couple Attack)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक