मुंबई : (Jejuri Khanderaya Temple) जेजुरी येथील श्री खंडेरायाच्या देवस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी मातंग समाजातील अनिल सौंदडे यांची नियुक्ती झाल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक परिवर्तन आणि समतेच्या वाटचालीचा संदर्भ समरसता मंच, बारामती जिल्ह्याच्या वतीने आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती अभिवादन कार्यक्रमात मांडण्यात आला. डॉ. धनंजय भिसे यांनी यावेळी महापुरुषांच्या विचारांचा व्यापक संदर्भ मांडला. (Jejuri Khanderaya Temple)
डॉ. भिसे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मंदिरप्रवेश चळवळीचा उल्लेख करताना मंदिरप्रवेशाचा प्रश्न हा केवळ देवदर्शनापुरता मर्यादित नव्हता, तर सामाजिक प्रतिष्ठा, समानता आणि माणूस म्हणून सन्मानाच्या अधिकाराशी जोडलेला होता, असे सांगितले. ज्या समाजाला एकेकाळी मंदिरप्रवेशासाठी संघर्ष करावा लागला, त्याच समाजातील व्यक्तीला आज मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मिळणे ही सामाजिक परिवर्तनाच्या प्रदीर्घ प्रवासातील महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महापुरुषांच्या विचारांकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची गरजही कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली. (Jejuri Khanderaya Temple)
महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांच्या कार्याचा उल्लेख करताना महापुरुषांचे विचार जाती-पंथाच्या चौकटीत न पाहता सामाजिक आणि राष्ट्रीय संदर्भात समजून घेण्याची भूमिका मांडण्यात आली.(Jejuri Khanderaya Temple)
यावेळी माळेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुयोग सातपुते, विरोधी पक्षनेते आरती शेंडगे, जेजुरी देवस्थानाचे विश्वस्त अनिल सौंदडे, सामाजिक कार्यकर्ते के. टी. जाधव, दीपकजी पेशवे, कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास लांडगे, विक्रम थोरात आदी उपस्थित होते. (Jejuri Khanderaya Temple)
विक्रम थोरात यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत सरतापे यांनी सूत्रसंचालन, तर गणेश थोरात यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. (Jejuri Khanderaya Temple)