काँग्रेसकडून राष्ट्रध्वजाचा अपमान; रमेश चेन्नीथला यांनी माफी मागावी; नवनाथ बन यांची मागणी

    18-Aug-2026   

Tricolor Cake Controversy
मुंबई : (Tricolor Cake Controversy) महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी थेट तिरंगा ध्वज असलेला केक कापत राष्ट्रध्वजाचा अपमान केला आहे. त्यामुळे रमेश चेन्नीथला यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली आहे.
 
 
रमेश चेन्नीथला यांचा केक कापतानाचा व्हिडीओ शेअर करत नवनाथ बन म्हणाले की, “केरळचे गृहमंत्री आणि महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी थेट तिरंगा ध्वज असलेला केक कापला आहे. ज्या तिरंग्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी बलिदान दिले, भारतीय जवान ज्याच्यासाठीव सीमेवर रक्त सांडतात, तो तिरंगा असलेला केक कापताना तुम्हाला लाज वाटत नाही. हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे.” (Tricolor Cake Controversy)
काँग्रेसची राष्ट्रभक्ती दुटप्पी
“काँग्रेसचे नेते दिवसभर राष्ट्रभक्तीच्या गप्पा मारतात आणि दुसरीकडे त्यांच्याच हातून तिरंग्याचा केक कापला जातो. काँग्रेसची ही दुटप्पी राष्ट्रभक्ती आता देशासमोर आली आहे. तिरंगा हा तुमच्या राजकीय कार्यक्रमाच्या सजावटीचा भाग नाही. तो भारताच्या अस्मितेचा आणि प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे प्रतीक आहे. चेन्नीथला आणि काँग्रेसची ही कृती देशविरोधी आहे. तिरंग्याचा अवमान करणाऱ्या काँग्रेसला देश राष्ट्रभक्तीचा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.” असेही नवनाथ बन म्हणाले. (Tricolor Cake Controversy)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर