मुंबई : (Mahila Morcha Meeting) भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाची संवादात्मक बैठक महिला प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चित्रा वाघ यांच्या अध्यक्षतेखालीर पडली. या बैठकीत जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष व त्यांच्या कमिटीसोबत संघटनात्मक बळकटीकरण आणि आगामी काळातील कामाची व्याप्ती याबाबत सविस्तर संवाद साधण्यात आला.(Mahila Morcha Meeting)
बैठकीत महिला मोर्चाची संघटनात्मक रचना अधिक सक्षम करणे, प्रत्येक मंडल व बूथस्तरापर्यंत संघटना सक्रिय करणे तसेच अधिकाधिक महिलांना संघटनेशी जोडणे याबाबत मार्गदर्शन देण्यात आले. (Mahila Morcha Meeting)
महिला मोर्चाचे काम केवळ कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता, संघटना विस्तार आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम बनले पाहिजे, यावर विशेष भर देण्यात आला. (Mahila Morcha Meeting)
या वेळी खासदार स्मिताताई वाघ, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, प्रदेश प्रतिनिधी जयश्रीताई अहिरराव, देवयानीताई बडगुजर, जिल्हाध्यक्ष कृतिकाताई अफ्रे, मनोरमाताई पाटील, नूतन पाटील, दीक्षा गायकवाड तसेच महिला मोर्चाच्या समस्त जिल्हाध्यक्ष, मंडल अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. (Mahila Morcha Meeting)