स्वातंत्र्य दिन आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

    17-Aug-2026
Panvel School Supplies Distribution
 
पनवेल : (Panvel School Supplies Distribution) देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन आणि पनवेल नगरीचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रुप ग्रामपंचायत दूंदरे अंतर्गत चिंचवली, रिटघर, दूंदरेपाडा, दूंदरे आणि शिवणसई येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम माजी सरसपणच रमेश पाटील आणि गुरुनाथ उसाटकर यांच्या माध्यमातून राबविण्यात आला.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना आवश्यक शालेय साहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.(Panvel School Supplies Distribution)
 
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्या वर्षा केवारे, माजी जिल्हा परिषद सदस्य व अनुसूचित जिल्हाध्यक्ष अमित जाधव, तसेच दूंदरे ग्रुप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच अनुसया वाघमारे, सदस्य शांताराम चौधरी, प्रलय भोपी, ललिता चौधरी, राणी सिनारे, विश्वास पाटील, माजी उपसरपंच नारायण चौधरी, चिंचवली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास भगत, माजी अध्यक्ष भालचंद्र भोपी, तुकाराम म्हस्कर, विठ्ठल शेळके, सुधीर पालांडे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला मंडळाचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Panvel School Supplies Distribution)
 
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शालेय साहित्य वितरित करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहपूर्ण वातावरणात आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी आयोजक रमेश पाटील आणि गुरुनाथ उसाटकर यांचे विशेष कौतुक केले. (Panvel School Supplies Distribution)
 
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणारे असे सामाजिक उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात यावेत, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.(Panvel School Supplies Distribution)
 
 




संबंधित मजकूर