मुंबई : (Chitra Wagh Statement) "फक्त नावापुढे ‘गांधी’ लावल्याने देशभक्ती सिद्ध होत नाही ती कृतीत आणि रग-रगात दिसावी लागते.‘जन गण मन’ हे आपले राष्ट्रगान आणि ‘वंदे मातरम्’ हे आपले राष्ट्रीय गीत दोन्हीही देशाच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहेत.
‘वंदे मातरम्’ सुरू असताना सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची सुरू असलेली कुजबुज ही केवळ राष्ट्रीय गीताचा नव्हे, तर देशाच्या भावनांचा अपमान आहे.याच निषेधार्थ सोनिया गांधी यांना ‘राष्ट्रीय गीत’ हे पुस्तक पाठवून, देशभक्तीचा खरा अर्थ आणि ‘वंदे मातरम्’मागची राष्ट्रभावना समजून घेण्याचा संदेश दिला."
अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी रविवार दि.१६ रोजी दिली.(Chitra Wagh Statement)
याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, माजी महापौर सीमाताई भोळे, प्रदेश महिला मोर्चाच्या जयश्रीताई अहिरराव, रेखाताई वर्मा, भाजपा जळगावच्या नीतूताई परदेशी, संगीताताई पाटील तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.(Chitra Wagh Statement)