नागपूर : (Chandrashekhar Bawankule) पृथ्वीराज चव्हाण यांना सध्या काहीही काम नसून माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी ते अशा पद्धतीने बोलतात, असे प्रत्युत्तर महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केलेल्या वंदे मातरम् गीताच्या अवमानाबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.
माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "काँग्रेसने किती लोकांचा जीव घेतला हे तपासून घेतले पाहिजे. गोपीनाथ मुंडे हे आमचे नेते होते. आमच्या पक्षाने सर्वच स्थानावर नेहमीच त्यांचा मान ठेवला आहे. शेवटी जन्म, मृत्यू आपल्या हाती नसतो. तो ठरलेला आहे. त्यामुळे अशा घटनांना गालबोट लावणे आणि त्यावर भाष्य योग्य नाही. व्यक्ती जिवंत नसताना त्यांच्याबद्दच्या भूमिका मिडीयामध्ये आणणे योग्य नाही. पृथ्वीराज चव्हाण हे वरीष्ठ नेते आहेत. आपण कुणाबद्दल आणि कशासाठी बोलतो हे त्यांनी समजून घेतले पाहिजे." (Chandrashekhar Bawankule)
ते पुढे म्हणाले की, "वंदे मातरम् गीताचा अपमान करणे म्हणजे भारत देशाची संस्कृती आणि अखंड हिंदूस्थानातील १४० कोटी जनतेचा अपमान केल्यासारखे आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत वंदे मातरम् गीताचा अपमान करणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजी, अशी माझी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंती आहे." (Chandrashekhar Bawankule)
मंत्री बावनकुळे म्हणाले की, "निवडणूक सहप्रभारी म्हणून मी राजस्थानला जातो आहे. तिथे आज स्थानिक नेत्यांसोबत जयपूरमध्ये बैठक आहे. त्याठिकाणी १० महानगरपालिका आणि ३०९ नगरपालिका असून तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आहेत. त्यासाठी मी सहप्रभारी म्हणून राजस्थानला जात असून माझ्यावर नेमकी काय जबाबदारी असेल, हे मला आज कळेल." (Chandrashekhar Bawankule)
रोहित पवार नकारात्मक वातावरण तयार करतात
रोहित पवार यांनी एसआयआर प्रक्रियेबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, "निवडणूक आयोगाच्या यंत्रणेविरोधात बोलणे हे संविधानविरोधी वक्तव्य आहे. एसआयआरमध्ये प्रत्येक बुथवर सर्वांना संधी आहे. सर्व पक्षांच्या बुथ लेव्हल एजेंटला एसआयआर करायचा आहे. त्यांना बुथ लेव्हल ऑफिसरसोबत काम करायचे आहे. शरद पवार यांच्या पक्षाचेही एजेंट तिथे आहेत. मग ते काय करतात? हा खोटारडेपणा सोडला पाहिजे. सर्वांनीच एसआयआरमध्ये प्रामाणिकपणे मदत केली पाहिजे. सर्वांनीच यात सहभागी होऊन एकही मतदार यातून सुटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. रोहित पवार हे नकारात्मक वातावरण तयार करत आहेत." (Chandrashekhar Bawankule)
"वसंतराव पुरके यांच्या आदिवासी आश्रमशाळेत मुलींच्या शौचालयाला दरवाजे नसल्याचे अहवालात समोर आली असून याची निश्चितपणे दखल घेतली जाईल. आदिवासी आश्रम शाळांमध्ये अशा प्रकारे शौचालयाला दरवाजे नसल्यास त्याची तपासणी करण्यात येईल. तसेच आदिवासी विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्याशी मी आजच यावर बोलेन," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.(Chandrashekhar Bawankule)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....