‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

    17-Aug-2026
Vande Mataram Protest Mumbai
 
मुंबई : (Vande Mataram Protest Mumbai) १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘वंदे मातरम्’ सुरू असताना राष्ट्रगीताच्या सन्मानाला ठेच पोहोचविणारे कृत्य केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईच्या वतीने रविवार दि.१६ रोजी मुंबईतील सहाही जिल्ह्यांमध्ये तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
 
हे आंदोलन भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार अमीत साटम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजयुमो मुंबई अध्यक्ष दीपक सिंह यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले.
 
याच अनुषंगाने दादर पूर्व येथील श्री स्वामीनारायण मंदिरासमोरही भाजयुमो मुंबई अध्यक्ष दीपक सिंह यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी ‘वंदे मातरम्’च्या सन्मानाचे आणि राष्ट्रीय स्वाभिमानाचे रक्षण करण्याचा संकल्प करत कार्यकर्त्यांनी सामूहिकरित्या ‘वंदे मातरम्’चे गायन केले. तसेच काँग्रेस नेत्यांच्या कथित अनादराच्या विरोधात आपला तीव्र निषेध लोकशाही मार्गाने नोंदविला. (Vande Mataram Protest Mumbai)
 
यावेळी भाजयुमो मुंबई अध्यक्ष दीपक सिंह म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदीविरोधाच्या अंधारात बुडालेली काँग्रेस आता राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करण्यापर्यंत पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध करता करता काँग्रेस पक्ष आता देश आणि देशाच्या राष्ट्रीय प्रतीकांचाही विरोध करण्याच्या मानसिकतेत उतरला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी ‘वंदे मातरम्’चा केलेला अनादर हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या राष्ट्रीय भावनांचा अपमान आहे. या घटनेतून काँग्रेसचे खरे स्वरूप देशासमोर आले आहे.” (Vande Mataram Protest Mumbai)
 
ते पुढे म्हणाले, “लाखो-कोट्यवधी स्वातंत्र्यसैनिक आणि देशभक्तांच्या मनात ‘वंदे मातरम्’ने राष्ट्रभक्तीची ज्वाला प्रज्वलित केली होती. हे गीत गाताना स्वातंत्र्यसैनिकांवर ब्रिटिश सत्तेने लाठीमार केला, त्यांना तुरुंगात डांबले; मात्र त्यांनी राष्ट्रभक्तीची भावना कधीही सोडली नाही. (Vande Mataram Protest Mumbai)
 
आज २०२६ मध्येही राष्ट्रगीताच्या सन्मानाबाबत काँग्रेसची मानसिकता बदललेली दिसत नाही. काँग्रेसची कथनी आणि करणी यातील फरक देशातील जनता चांगल्या प्रकारे जाणून आहे.” (Vande Mataram Protest Mumbai)
 
या आंदोलनास भाजयुमो मुंबईचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, मंडल पदाधिकारी, युवा कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने देशभक्त नागरिक उपस्थित होते. (Vande Mataram Protest Mumbai)
 
 - अभिनंदन परुळेकर 




संबंधित मजकूर