आंध्र प्रदेशात डॉक्टरांचा आक्रोश; आपत्कालीन सेवांवरही बहिष्कार


Andhra Pradesh Junior Doctors Strike 
 
अमरावती (Andhra Pradesh Junior Doctors Strike) : स्टायपेंडमध्ये १५ टक्के वाढ करण्याच्या मागणीसाठी आंध्र प्रदेशातील कनिष्ठ डॉक्टरांचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. राज्यातील सर्व १९ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील सुमारे ९ हजार निवासी डॉक्टर, इंटर्न, ज्युनियर व सिनियर रेसिडेंट, सुपर-स्पेशालिटी विद्यार्थी आणि डिस्ट्रिक्ट रेसिडेन्सी प्रोग्राम अंतर्गत डॉक्टरांनी सोमवारी आपत्कालीन सेवांवरही पूर्ण बहिष्कार टाकला.
 
दि. ११ ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सरकारकडून लेखी आश्वासन न मिळाल्याने डॉक्टरांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे ICU, कॅज्युअल्टी, लेबर रूमसह विविध वैद्यकीय सेवांवर परिणाम झाला असून गैर-आपत्कालीन सेवा मोठ्या प्रमाणात बंद आहेत. (Andhra Pradesh Junior Doctors Strike)
 
 
 
आंध्र प्रदेश जुनिअर डॉक्टर्स असोसिएशन (APJUDA) च्या म्हणण्यानुसार, स्टायपेंडवाढ दि. १ जानेवारीपासून प्रलंबित आहे. २००९ च्या आदेशानुसार दर दोन वर्षांनी सुमारे १५ टक्के वाढ अपेक्षित आहे. मात्र सरकारने पीजी ज्युनियर डॉक्टरांसाठी ३टक्के, तर हाऊस सर्जन आणि इंटर्नसाठी ५ टक्के वाढीचा प्रस्ताव दिला आहे. (Andhra Pradesh Junior Doctors Strike)
 
दरम्यान, रुग्णसेवा सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त डॉक्टर तैनात केल्याचा सरकारचा दावा आहे. ICU, ट्रॉमा, NICU, PICU, डायलिसिस, ऑपरेशन थिएटर आणि प्रसूती सेवा सुरू ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारच्या मते, १५ टक्के वाढीमुळे वार्षिक सुमारे ८७.९१ कोटींचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. (Andhra Pradesh Junior Doctors Strike)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर