आजपासून मुंब्रा नाही, 'मुंब्रादेवी' म्हणा!मंत्री नितेश राणे यांचे हिंदूंना आवाहन

हे हिंदू राष्ट्र, कुणाच्या अब्बाचे पाकिस्तान नाही

    16-Aug-2026
Nitesh Rane Mumbradevi
 
ठाणे : (Nitesh Rane Mumbradevi) "मुंब्रा हे हिंदू राष्ट्र आहे, कुणाच्या 'अब्बा'चे पाकिस्तान नाही. भगवान महादेव आणि मुंब्रादेवी यांच्या भक्तीने पावन झालेली ही पवित्र भूमी आहे. त्यामुळे आजपासून प्रत्येकाने या शहराचा उल्लेख 'मुंब्रा' न करता, 'मुंब्रादेवी' असाच करावा," असे राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी रविवारी ठणकावून सांगितले. (Nitesh Rane Mumbradevi)
 
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वतः या भूमीत मुंब्रादेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असत. हा आपल्या स्वराज्य आणि संस्कृतीचा गौरवशाली इतिहास आहे. त्यामुळे मुंब्रादेवी हे ठिकाण कालही भगवे होते, आजही भगवे आहे आणि उद्याही भगवेच राहील, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला. (Nitesh Rane Mumbradevi)
 
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने श्री मुंब्रेश्वर महादेव कावडिया मंडळाच्या वतीने मुंब्रा शहरात भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत सहभागी होऊन मंत्री नितेश राणे यांनी हिंदू जनसमुदायाशी संवाद साधला. "माझ्या मुंब्र्यात येण्याच्या बातमीने अनेकांच्या पोटात दुखत होते. नितेश राणे यांनी मुंब्र्यात येऊ नये, असे काहींना वाटत होते. परंतु, हे शहर हिंदू राष्ट्रात आणि हिंदू महाराष्ट्रात येते. त्यामुळे आपल्याच देशात हिंदू बांधवांना भेटायला आणि त्यांना ताकद द्यायला येण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही," असे नितेश राणे यांनी भाषणात स्पष्ट केले. (Nitesh Rane Mumbradevi)
 
मुंब्रा ही महादेवाची भूमी आहे. त्यामुळे कोणीही भीतीपोटी किंवा कुणाच्या 'खौफ'मुळे हे शहर सोडून पलायन करण्याचा विचारही मनात आणू नये. मुंब्रादेवीमध्ये हिंदूंची लोकसंख्या वाढली पाहिजे आणि अधिकाधिक हिंदूंनी येथे हक्काने राहिले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार पूर्ण ताकदीने हिंदू समाजाच्या पाठीशी उभे आहे, अशी ग्वाही नितेश राणे यांनी यावेळी दिली. (Nitesh Rane Mumbradevi)
 
"तुम्ही सर्वांनी मतदानाच्या माध्यमातून राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आणले आहे. तुम्ही आहात म्हणून आम्ही आज मंत्रालयात बसलो आहोत. त्यामुळे हिंदू बांधवांचे रक्षण करणे आणि हिंदू भगिनींना सुरक्षितता पुरवणे हे आमचे कर्तव्य आहे. कोणीही तुमच्याकडे वाईट नजरेने पाहू शकणार नाही, एवढी मोठी ताकद तुमच्यामागे उभी आहे," असेही राणे यांनी यावेळी सांगितले. (Nitesh Rane Mumbradevi)
 
हिंदूंना धमकी आल्यास एका तासात हजर होणार
 
जेव्हा कुणी तुम्हाला धमकावण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा तुमचा हा भाऊ नितेश राणे एका तासात तुमच्या रक्षणासाठी मुंब्रादेवीमध्ये येऊन उभा राहील", अशी ग्वाही नितेश राणे यांनी यावेळी मुंब्रावासीयांना दिली. कावड यात्रेप्रमाणे हिंदू समाजाने आपले सर्व सण आणि उत्सव अत्यंत जोशात, जल्लोषात आणि निर्भयपणे साजरे केले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले. (Nitesh Rane Mumbradevi)
 
हिरव्या पिलावळीची वळवळ
 
मंत्री नितेश राणे यांना मुंब्र्यात येण्याची बंदी घालावी अशी मागणी मुंब्रामधील एमआयएमच्या हिरव्या पिलावळीने केली होती.. त्यासाठी एमआयएमचा नगरसेवक सैफ पठाण याने चक्क पोलिसांना पत्र पाठवले होते. पाठवत अशी मागणी केली..मात्र या हिरव्या पिलावळीला भीक न घालता मंत्री नितेश राणे यांनी मुंब्र्यात येऊन हिंदुत्वाचा आवाज बुलंद केल्याने मुंब्र्यातील हिंदूंमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. (Nitesh Rane Mumbradevi)
 
 




संबंधित मजकूर