साठये महाविद्यालयात रंगला मुंबई विद्यापीठाचा ५९वा युवा महोत्सव

    16-Aug-2026
Sathaye College Youth Festival
 
(भारतीय समूहगीत गायन प्रकारात विजेता साठये महाविद्यालयाचा संघ प्राध्यापक डॉ. गजेंद्र देवडा यांच्या हस्ते प्रमाणपत्र घेताना)
 
मुंबई : (Sathaye College Youth Festival) मुंबई विद्यापीठाच्या ५९व्या युवा महोत्सवाच्या विभागीय स्तरावरील विभाग तीन मधील स्पर्धांचे १२ आणि १३ ऑगस्ट ला साठये महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये ५५ महाविद्यालयांतील सुमारे २,००० विद्यार्थी स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संगीत, नृत्य आणि नाट्य या तीन प्रमुख कलाप्रकारांमध्ये १९ वैयक्तिक व सांघिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
 
विविध कलाक्षेत्रातील २० नामवंत परीक्षकांनी स्पर्धांचे परीक्षण केले. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे, सर्जनशीलतेचे आणि कौशल्याचे प्रभावी सादरीकरण करत स्पर्धांमध्ये रंगत आणली. या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना सादर करण्यासाठी तसेच विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी भव्य व्यासपीठ उपलब्ध झाले.(Sathaye College Youth Festival)
 
या स्पर्धांचे उद्घाटन पार्ले टिळक असोशिएशनचे सचिव दिलीप पेठे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. उद्धघाटनानंतर विविध स्पर्धांना सुरुवात झाली. दोन दिवस महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांचा उत्साह, ऊर्जा आणि जल्लोष पाहायला मिळाला. सर्व स्पर्धांचे नियोजन शिस्तबद्ध, निष्पक्ष आणि सुरळीत पद्धतीने करण्यात आले.(Sathaye College Youth Festival)
 
विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सहभाग घेत आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. संगीत स्पर्धांमध्ये सुरांची मैफल, नृत्य स्पर्धांमध्ये विविध नृत्यप्रकारांचे सादरीकरण, तर नाट्य स्पर्धांमध्ये प्रभावी अभिनय आणि आशयपूर्ण प्रयोगांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.(Sathaye College Youth Festival)
 
महोत्सवाच्या बक्षीस वितरण आणि समारोपप्रसंगी पार्ले टिळक असोसिएशनचे कोषाध्यक्ष बन्सीधर धुरंधर आणि मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.(Sathaye College Youth Festival)
 
युवा महोत्सवाने विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, नेतृत्वगुण, सांघिक भावना आणि सर्जनशीलतेला चालना देत त्यांच्या कलागुणांना भव्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विभाग तीन चे समन्वयक डॉ. दादाराव मस्के आणि सहसमन्वयक आलोक हर्डीकर यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून व्यवस्थापनाची महत्त्वाची भूमिका पार पाडली.(Sathaye College Youth Festival)
 
कनिष्ठ महाविद्यालयाचे संयोजन प्राध्यापक सुनील पाटील आणि वृषाली पाटील यांनी केले होते.या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनामध्ये साठये महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुरज पंडित,अनुराधा नाम जोशी आणि डॉ.स्वरूपा साळवी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत प्राध्यापक, समन्वयक, परीक्षक, विद्यार्थी स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान आहे, त्यामुळे हे यश सांघिक यश आहे अशा भावना महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समन्वयक डॉ. स्वाती आचरेकर आणि सहसमन्वयक डॉ.संदीप कदम, डॉ. गजेंद्र देवडा यांनी व्यक्त केल्या.(Sathaye College Youth Festival)
 
 




संबंधित मजकूर