‘एक पेड माँ के नाम’ आता लोकचळवळ; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड च्या दिशेने धाराशिवची वाटचाल

प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीत ‘हरित धाराशिव २.०’चा शुभारंभ

    16-Aug-2026
Green Dharashiv 2.0
 
मुंबई : (Green Dharashiv 2.0) "भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला “एक पेड माँ के नाम” हा संदेश केवळ वृक्षारोपणाचा कार्यक्रम नाही, तर आई, माती आणि पर्यावरण यांच्याशी असलेले आपले नाते अधिक घट्ट करणारी भावनिक चळवळ आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या संकल्पनेतून ही चळवळ आता लोकचळवळ बनत आहे." असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
 
१० लाखांहून अधिक वृक्ष लागवड संकल्प
 
"हरित धाराशिव अभियान २.०" या उपक्रमाचा शुभारंभ 'सह्याद्री देवराई' हरीत चळवळीचे प्रमुख अभिनेते सयाजी शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शनिवार दि.१५ रोजी केला गेला त्यावेळी ते बोलत होते. या अभियानांतर्गत धाराशिवमध्ये १० लाखांहून अधिक वृक्ष लागवड करून त्यांच्या संगोपनाचा संकल्प करण्यात आला. यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.(Green Dharashiv 2.0)
 
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स
 
"सन २०२५ मध्ये “हरित धाराशिव अभियान १.०” अंतर्गत एकाच दिवशी १९ जुलै रोजी तब्बल १७ लाख १ हजार ८१५ वृक्षांचे रोपण करून धाराशिवने जागतिक विक्रम प्रस्थापित केला. या विक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली. या अभियानात लावलेल्या रोपांपैकी ८६.९७ टक्के रोपे जिवंत राहिली, ही आपल्या सामूहिक प्रयत्नांची खरी पावती आहे." असेही सरनाईक म्हणाले.(Green Dharashiv 2.0)
 
“हरित धाराशिव अभियान २.०”च्या माध्यमातून केवळ १२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षारोपण करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम करण्याचा संकल्प असून जिल्ह्यातील ८ ठिकाणी तब्बल ८३.२६ एकर क्षेत्रावर मियावाकी पद्धतीने घनवन विकसित केले जाणार आहे आणि तब्बल १० लाख ११ हजार स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात येणार आहे.(Green Dharashiv 2.0)
 
रोपांची डिजिटल नोंद
 
यात आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व प्रत्येक रोपाला स्वतंत्र QR कोड देण्यात येणार आहे. त्याची डिजिटल नोंदसह फोटोग्राफी, व्हिडिओ रेकॉर्डिंग, ड्रोन शूटिंग आणि हस्तलिखित लॉगबुकच्या माध्यमातून प्रत्येक रोपाची अचूक नोंद ठेवली जाणार आहे.(Green Dharashiv 2.0)
 
 




संबंधित मजकूर