मुंबई : (Controversial Statements By Congress Leaders) भाजपला मोठ करणाऱ्या नेत्यांपैकी एक नाव म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे.पण काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी," गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाणार होते."असे वक्तव्य करत शनिवार दि.१५ रोजी प्रसिध्दी मिळवण्याचा प्रयत्न केला. भाजपकडून त्यांच्या या विधानावर सडेतोड प्रत्युत्तर दिले गेले.(Controversial Statements By Congress Leaders)
सत्तेतून बाहेर पडल्यानंतर काँग्रेस कशी सैरभैर झाली आहे त्याचे हे उदाहरण.पण काँग्रसची अशी वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही आजची नाही आहे.आपल्या हाय कमांडप्रमाणे सातत्याने दुसऱ्यांचा अपमान करणं ही आता काँग्रेसच्या नेत्यांची सवयच झाली आहे.पृथ्वीराज चव्हाण तर यात सर्वात पुढे असतात.(Controversial Statements By Congress Leaders)
काँग्रेस नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
'राष्ट्रवादीला लोकसभेच्या निवडणुकीत एकही जागा मिळणार नाही.' असे वक्तव्य २०२४ साली चव्हाण यांनी केले होते.आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची नाराजी ओढवून घेतली होती.तर ऑगस्ट २०२५ मध्ये देखील मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील निकालानंतर हिंदूंच्या बाबतीत सनातनी दहशतवाद ,हिंदु दहशतवाद हा शब्द वापरून त्यांनी हिंदू भावना दुखावल्या होत्या.(Controversial Statements By Congress Leaders)
"ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी आपण हरलो होतो आणि पाकिस्तानने भारताची विमानं पडली होती."असे सुद्धा वादग्रस्त वक्तव्य मध्यंतरी पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते.यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार करताना म्हटले होते की,"ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून पाकिस्तानला एक जबरदस्त उत्तर भारतीय लष्कराने दिले होते. यानंतर काँग्रेसकडून अशा प्रकारे वक्तव्य होते ही चिंताजनक , दुर्दैवी आणि देश विघातक बाब आहे.काँग्रेसचे पाकिस्तान प्रेम ओतू चालले आहे."(Controversial Statements By Congress Leaders)
‘एपस्टीन फाइल्स’चा दावा
एपस्टीन फाइल्स वरून देशाच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असून दिल्लीतील एका सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीस राजीनामा द्यायला लागणार असा दावा त्यांनी केला होता.पण तो बॉम्ब देखील फुसका निघाला होता.शेवटी काँग्रेस सत्तेबाहेर गेल्यानंतर काँग्रेस मधील दुर्लक्षित नेते असे काहीतरी अकल्पित बोलून लक्ष स्वतःकडे ओढून घेत असतात. (Controversial Statements By Congress Leaders)
काँग्रेसकडून 'वंदे मातरम्' चा अपमान
सध्या तर काँग्रेसचे हायकमांड ' वंदे मातरम्' चा अपमान करण्यास सुद्धा मागेपुढे पाहत नाही हे १५ ऑगस्ट रोजी काँग्रेस मुख्यालयातील प्रसंगावरून सर्वांना कळाले. खासदार राहुल गांधी यांनी तर लोकसभेत विधेयक चर्चेदरम्यानच गृहमंत्री अमित शहांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते.त्यामुळे वरिष्ठ नेतृत्व जसे बोलतात तसेच त्यांचे इतर नेते बोलत असतात. पण त्या बोलण्यात आणि प्रत्यक्ष घटनेत काहीही तथ्य नसते.(Controversial Statements By Congress Leaders)
सत्ता गेली की लोकांच्यात जाण्यापेक्षा कॅमेऱ्यासमोर असे वादग्रस्त वागणे हेच काँग्रेसचे सध्याचे धोरण सुरू आहे.(Controversial Statements By Congress Leaders)