आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार — आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

    16-Aug-2026
Health Minister Prakash Abitkar
 
मुंबई : (Health Minister Prakash Abitkar) "निरोगी महाराष्ट्र – सुदृढ महाराष्ट्र’ या संकल्पनेत नागरिकांचा थेट सहभाग वाढवून आरोग्य सेवांमधील अडचणी समजून घेणे, त्यावर प्रभावी उपाययोजना करणे आणि प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, हा आरोग्य विभागाचा प्रयत्न राहणार आहे."असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
 
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत महिला आरोग्य समिती , जन आरोग्य समिती तसेच रुग्णकल्याण समिती यांच्या सदस्यांशी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ऑनलाइन पद्धतीने ‘जन आरोग्य संवाद’ साधला. यावेळी राज्यातील विविध भागांतील आरोग्य सेवांची वस्तुस्थिती जाणून घेत त्यांनी समित्यांच्या कामकाजाचा आणि नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांचा आढावा घेतला.(Health Minister Prakash Abitkar)
 
डॉक्टरांच्या उपस्थितीपासून रुग्णसेवेपर्यंत थेट आढावा
 
या संवादामध्ये आरोग्यमंत्री आबिटकर यांनी समित्यांच्या बैठका नियमित होतात का, रुग्ण दवाखान्यात येतात का, डॉक्टर वेळेवर उपस्थित राहतात का, डॉक्टर रुग्णांशी योग्य संवाद साधतात का, रुग्णालयांमध्ये आवश्यक सेवा उपलब्ध आहेत का, यासह विविध आरोग्य सेवा विषयक बाबींची थेट माहिती घेतली.(Health Minister Prakash Abitkar)
 
लोकप्रतिनिधींकडून आरोग्य व्यवस्थेबाबत सूचना
 
या जन आरोग्य संवादामध्ये लोकप्रतिनिधींनीही आरोग्य सेवांबाबतच्या सूचना मांडल्या. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्य विभागाशी संबंधित तक्रारींसाठी स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्याची तसेच शासकीय दवाखान्यांमध्ये अनुपस्थित राहणाऱ्या डॉक्टरांच्या अनुषंगाने १आठवड्यातून एक दिवस निश्चित करून आढावा बैठक घेण्याची सूचना केली. या सूचनेला आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.(Health Minister Prakash Abitkar)
 
राज्यभरातून लोकप्रतिनिधींचा सहभाग
 
या ऑनलाइन जन आरोग्य संवादात राज्यमंत्री,आशिष जयस्वाल, माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रकाशदादा सोळंके, आमदार सुरेश धस, आमदार दौलत दरोडा, आमदार किसन कथोरे, आमदार विनोद निकोले, आमदार प्रवीण स्वामी, आमदार राजू तोडसाम, उमेश ऊर्फ चंदू यावलकर, आमदार प्रवीण तायडे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार नितीन पवार यांच्यासह विविध ठिकाणचे नगराध्यक्ष, आरोग्य समित्यांचे पदाधिकारी व सदस्य ऑनलाइन सहभागी झाले.(Health Minister Prakash Abitkar)
 
यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव-२ श्री. ई. रविंद्रन, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक श्री. संजय श्रीपतराव काटकर, आयुक्त, शहरी आरोग्य डॉ. सुनील भोकरे, संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत, कोल्हापूर विभागाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने तसेच राज्यातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले.(Health Minister Prakash Abitkar)
 
 




संबंधित मजकूर