जिल्हा परिषद ठाणे येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात...‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा प्रतिज्ञेसह तंबाखूमुक्ती, मृदा व जलसंधारणाची शपथ

    15-Aug-2026

Thane Zilla Parishad Independence Day
 
 
ठाणे,((Thane Zilla Parishad Independence Day) : जिल्हा परिषद, ठाणे येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. त्यानंतर वंदे मातरम्, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन करण्यात आले.(Thane Zilla Parishad Independence Day)
 
‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीची भावना दृढ करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तिरंगा प्रतिज्ञा घेतली. तसेच तंबाखूमुक्त समाजनिर्मिती, मृदा संवर्धन आणि जलसंधारणासाठी शपथ घेत पर्यावरण व सामाजिक आरोग्य जपण्याचा संकल्प केला.(Thane Zilla Parishad Independence Day)
 
तंबाखूमुक्ती, जलसंधारण आणि मृदा संवर्धन यांसारख्या विषयांबाबत जनजागृती वाढवून निरोगी, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक समाजनिर्मितीसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.(Thane Zilla Parishad Independence Day)
 
याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, विभागप्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.(Thane Zilla Parishad Independence Day)
 
 
 




संबंधित मजकूर