ईडनवूड्सच्या रहिवाशांचा विकासाला विरोध नाही; मात्र परिसर उद्ध्वस्त करू नका :सार्वजनिक वाहतुकीला पाठिंबा; मात्र रिंग रेल्वे स्थानकाच्या मार्गात बदलाची मागणी
ठाणे(Thane Ring Railway): डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळील ईडनवूड्स कॉम्प्लेक्समधील तीन हजारांहून अधिक रहिवाशांनी ठाणे रिंग रेल्वे प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. प्रकल्पाला विरोध नाही; मात्र सोसायटीच्या मुख्य प्रवेश-निर्गमद्वारांवर प्रस्तावित स्थानकाला तीव्र विरोध असल्याचे रहिवाशांनी सांगितले. स्थानक अन्यत्र हलवावे किंवा पर्यायी मार्गाचा विचार करावा, या मागणीसाठी स्वातंत्र्यदिनी रहिवासी एकत्र आले.(Thane Ring Railway)
रहिवाशांच्या शिष्टमंडळाने यापूर्वी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, उपआयुक्त प्रशांत रोडे, खासदार नरेश म्हस्के आणि महामेट्रोच्या प्रतिनिधींसमोर आपली भूमिका मांडली आहे. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर यांची भेट घेऊन मागणी मांडण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला आहे.(Thane Ring Railway)
ग्लॅडिस अल्वारिस आणि नाथ पै रोड परिसरात आधीच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. घोडबंदर रोडवरील वाहतूक, काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, बँक्वेट हॉल आणि इतर व्यावसायिक आस्थापनांमुळे कार्यक्रमांच्या वेळी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढते. त्यात दुहेरी पार्किंग, फेरीवाले आणि सुरू असलेल्या बांधकामांमुळे रस्त्यांवर अतिरिक्त ताण असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.(Thane Ring Railway)
या पार्श्वभूमीवर सोसायटीच्या प्रवेशद्वारावर स्थानक उभारल्यास प्रवासी वाहतूक, अनधिकृत पार्किंग आणि विक्रेत्यांमुळे प्रवेश-निर्गम मार्ग अडथळित होण्याची तसेच आपत्कालीन सेवांवर परिणाम होण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली. बांधकामातील कंपनांमुळे जुन्या इमारतींना धोका, वृक्षतोड आणि ध्वनीप्रदूषणाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.(Thane Ring Railway)
महामेट्रो आणि शहर नियोजकांनी पर्यायी संरेखन, भूमिगत मार्ग किंवा स्थानक निवासी प्रवेशद्वारांपासून दूर हलविण्याचा पर्याय तपासावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. अंतिम DPRपूर्वी अर्थपूर्ण सार्वजनिक सल्लामसलत करण्याचीही मागणी करण्यात आली.(Thane Ring Railway)
अन्यथा उपोषणाचा मार्ग
“सार्वजनिक वाहतूक आणि शहराच्या विकासाला आमचा ठाम पाठिंबा आहे. मात्र विकासाच्या नावाखाली रहिवाशांची सुरक्षितता, आरोग्य आणि दैनंदिन वाहतूक धोक्यात येऊ नये. आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार न झाल्यास शांततामय उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” (Thane Ring Railway)