ठाणे,(Thane Municipal Corporation Independence Day) : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते. महापालिकेचे सुरक्षा दल, अग्निशमन दल आणि टीडीआरएफच्या जवानांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.(Thane Municipal Corporation Independence Day)
स्वातंत्र्य दिनाच्या या सोहळ्यात ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १० प्रातिनिधिक सफाई कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. बदलत्या ठाण्याच्या स्वच्छतेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचा सन्मान करण्याचा उद्देश असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.(Thane Municipal Corporation Independence Day)
यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी ठाणेकरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना तसेच शहरातील विविध ठिकाणी असलेल्या महनीय व्यक्तींच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.(Thane Municipal Corporation Independence Day)
सोहळ्यास उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ ऊर्फ शानू पठाण, विविध प्रभाग समित्यांचे अध्यक्ष, नगरसेवक, भाजपा गटनेते मुकेश मोकाशी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, गुणवंत कामगारांचे कुटुंबीय आणि नागरिक उपस्थित होते.(Thane Municipal Corporation Independence Day)
गुणवंत सफाई कर्मचारी : प्रविण श्रीराम बनोटे, दीपक लक्ष्मण कोंडुळे, लागून कृष्णा नाडार, अशोक धोंडिबा पाटील, दीपिका अशोक खाजेकर, शालूबाई गोविंद धोत्रे, आत्माराम बाबू पाटील, सोनल सुनील पाटील, अनिल तुळशीराम कदम, माधुरी धनावडे आणि सुनीता दुधाम यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.(Thane Municipal Corporation Independence Day)