नवी दिल्ली (Sonia Gandhi Vande Mataram Video) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या विशेष कार्यक्रमाला काँग्रेसचे अनेक नेते अनुपस्थित होते. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे हेही या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. काँग्रेस नेत्यांनी दिल्लीतील पक्ष कार्यालयात ध्वजारोहण केले.
दिल्लीतील काँग्रेस पक्ष कार्यालयात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादरम्यान ‘वंदे मातरम्’चे गायन करण्यात आले. पहिले कडवे संपेपर्यंत राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे उभे होते. मात्र, पुढील कडवे सुरू होताच राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलल्याचे दिसून आले. त्याचवेळी मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Sonia Gandhi Vande Mataram Video)
या व्हिडीओत ‘वंदे मातरम्’च्या गायनादरम्यान सोनिया गांधी नाराज झाल्याचे दिसत आहे. तसेच, सोनिया गांधी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना फटकारल्याचेही दावे सोशल मीडियावर केले जात आहेत (Sonia Gandhi Vande Mataram Video)
या प्रकरणावर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी ‘वंदे मातरम्’च्या गायनाबद्दल कोणताही रोष नव्हता किंवा ते थांबवण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही, असे स्पष्ट केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, सोनिया गांधी यांना असे वाटले की मल्लिकार्जुन खरगे बराच वेळ उभे होते आणि त्यामुळे त्यांनी सेवा दलाच्या एका सदस्याकडे खुर्चीची मागणी केली.
मात्र, सोशल मीडियावरून यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसरे कडवे संपल्यानंतर तिसरे कडवे सुरू झाले, त्याच वेळी खरगे यांना बराच वेळ उभे राहिल्यामुळे खुर्चीची गरज असल्याचे सोनिया गांधी यांच्या लक्षात आले का, असा सवाल राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. (Sonia Gandhi Vande Mataram Video)
‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास कठोर शिक्षा
‘वंदे मातरम्’ला कायदेशीर संरक्षण देण्यासाठी राष्ट्रीय गौरव अपमान निवारण अधिनियम, १९७१ मध्ये सुधारणा करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. राष्ट्रीय गौरव अपमान निवारण (संशोधन) अधिनियम, २०२६ अंतर्गत ‘वंदे मातरम्’चे गायन जाणूनबुजून रोखणे किंवा त्यात अडथळा निर्माण करणे हा गंभीर अपराध मानला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा कारावास आणि दंड अशी शिक्षा होऊ शकते. (Sonia Gandhi Vande Mataram Video)
यापूर्वी १९७१च्या कायद्यात ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताला कायदेशीर संरक्षण देण्यात आले होते. राष्ट्रगीताचे गायन रोखणे किंवा त्यात अडथळा आणल्यास तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंडाची तरतूद होती. तसेच, याच अपराधाची पुनरावृत्ती झाल्यास किमान एक वर्षाच्या कारावासाची तरतूद होती. (Sonia Gandhi Vande Mataram Video)
आता नव्या सुधारणेद्वारे ‘वंदे मातरम्’चाही कायदेशीर संरक्षणाच्या कक्षेत समावेश करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. (Sonia Gandhi Vande Mataram Video)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.