महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भीम शक्तीमुळे मी केंद्रात मंत्रीपदापर्यंत पोहचलो - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

केंद्रीय राज्यमंत्री पदाच्या दशकपूर्ती निमित्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सह अनेक मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार

    15-Aug-2026
Ramdas Athawale
 
मुंबई : (Ramdas Athawale) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर मी तुमच्यापुढे आज उभा नसतो. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमशक्तीमुळेच, आंबेडकरी जनतेच्या भीमशक्तीमुळे मी केंद्रीय मंत्रीपदाच्या तख्ता पर्यंत पोहचु शकलो अशी कृतज्ञ भावना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज व्यक्त केली.
 
केंद्रीय राज्यमंत्री पदाच्या दशकपुर्ती निमीत्त आयोजित सत्काराला उत्तर देतांना ना.रामदास आठवले बोलत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, आमदार प्रविण दरेकर, रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रिपाइंचे मुंबई प्रदेशचे सरचिटणीस विवेक पवार यांनी केले.(Ramdas Athawale)
 
यावेळी सौ. सिमाताई आठवले, कुमार जीत आठवले, रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे;पुण्याचे उपमहापौर पुरुषोत्तम वाडेकर, पप्पु कागदे, आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.(Ramdas Athawale)
 
राजकारणात मला अनेक आंबेडकरी चळवळीतल्या विचारवंतानी पत्रकारांनी सल्ला दिला होता आणि त्यानुसार मी राजकारणात भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात शिवसेना भाजप सोबत युती करण्याचा निर्णय घेतला .मी शिवसेना भाजपबरोबर युती केल्यामुळे युतीची महायुती झाली. शिवशक्ती भिमशक्ती भाजप महायुती प्रचंड यशस्वी झाली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आशिर्वाद आणि आंबेडकरी भिमशक्तीने मी केंद्रात केंद्रीय पदापर्यंत पोहचु शकलो. गेली 10 वर्ष केंद्रात राज्यमंत्री आहे. आता माझे प्रमोशन झाले पाहिजे.केंद्रीय कॅबिनेट मंत्री पद रिपब्लिकन पक्षाला मिळाले पाहिजे या मागणीकडे ना.रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले.(Ramdas Athawale)
 
2019 च्या निवडणुकांत घोषणा होती देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र त्यावेळी मी म्हणत होतो मी आहे देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि तुमच्यात मी केंद्र अशी चारोळी ना. रामदास आठवले यांनी ऐकवली.(Ramdas Athawale)
 
महाराष्ट सरकारने महिलांना लाडकी बहिण योजनेद्वारे महिलांना 1500 रुपये देण्याची योजना आखली. ती यशस्वी झाली. मी यापूर्वीच मागणी केल्याप्रमाणे महिलांना लाडकी बहिण योजनेद्वारे दरमहा 2100 रुपये देण्याचे माझी मागणी राज्य सरकारने मंजुर करावी असे ना. रामदास आठवले म्हणाले. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी माझे संबंध चांगले तर कॉग्रेसच्या राहुल गांधी सोबत माझे संबंध चांगले नाहीत असा टोला ना. रामदास आठवले यांनी यावेळी लगावला.
 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रधानमंत्री पदाला 12 वर्ष झाली. माझ्या राज्यमंत्री पदाला 10 वर्ष झाली. याच्यापुढे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची 15 वर्षाची कारकिर्द पुर्ण होईल आणि माझी 13 वर्षाची होईल. 2029 मध्ये पुन्हा महायुतीचीच सरकार येईल. नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात एनडीएचेच सरकार येईल. केंद्रात मी पुन्हा 5 वर्षासाठी केंद्रात राज्यमंत्री होईल आणि पुढची 10 वर्ष केंद्रात मंत्री राहीन.कोणी आम्हाला हलवु शकत नाही असे ना. रामदास आठवले यावेळी म्हणाले.(Ramdas Athawale)
 
महायुतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी आठवलेंनी जोडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
ना. रामदास आठवले यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाची 10 वर्ष पूर्ण केली. पुढची 10 वर्षही केंद्रीय राज्यमंत्री पदावर ना. रामदास आठवले कायम राहतील. त्यांची इच्छा निश्चितच पूर्ण होईल. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. ना. रामदास आठवले यांनी दलित पँथरच्या काळात गावोगावी पोहचुन आंबेडकरी चळवळीमध्ये प्रचंड संघर्ष केला. संघर्षातुन ते पुढे आले. मात्र संघर्षातुन जरी ते पुढे आले असले तरी त्यांच्या मनामध्ये कुणाबद्दलही कटुता नाही. कोणत्या पक्षाबद्दल कोणत्या जातीबद्दल, कोणत्या व्यक्तीबद्दल कधीच त्यांनी कटुता बाळगली नाही.(Ramdas Athawale)
 
ते नेहमीच सर्वांशी सुसंवाद साधत राहिले. महायुतीला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी जोडण्याचे काम रामदास आठवले यांनी केले.त्यामुळे ते केंद्रात मंत्री बनु शकले. ते पुढचीही 10 वर्ष केंद्रात मंत्री राहतील अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ना. रामदास आठवले यांना दिल्या.(Ramdas Athawale)
 
 
 
 




संबंधित मजकूर