नवी दिल्ली: (PM Modi Independence Day 2026 Speech) भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला १३ व्यांदा संबोधित केले. विशेष म्हणजे, यंदाच्या कार्यक्रमात राष्ट्रगीताच्या आधी 'वंदे मातरम'चे गायन करण्यात आले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी जागतिकीकरणानंतरच्या आर्थिक आव्हानांना उत्तर देण्यासाठी ‘सप्तधारा’ नावाच्या सात-कलमी विकास योजनेची घोषणा केली. तसेच, देशातील तरुणांसाठी १ कोटींहून अधिक एआय (AI) कौशल्य प्रशिक्षण आणि 'वैचारिक नक्षलवाद्यां'पासून देशाला सतर्क राहण्याचा गंभीर इशारा दिला. (PM Modi Independence Day 2026 Speech)
'सप्तधारा' सात-कलमी योजना आणि आर्थिक सुधारणा...
पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा मोठा भाग 'सप्तधारा' या संकल्पनेवर केंद्रित होता, ज्याद्वारे भारताच्या आर्थिक विकासाला गती देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गुणवत्तेवर भर देऊन उत्पादन क्षमता वाढवणे, कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग, आणि अंतराळ संशोधनासाठी खाजगी क्षेत्राला अधिक संधी देणे. पुढील १-२ वर्षांत देशात ७ ते ८ सेमीकंडक्टर कारखाने सुरू करणे, तसेच 'गती शक्ती' अंतर्गत वाहतूक, मालवाहतूक आणि देशांतर्गत शस्त्रास्त्र निर्मितीला चालना देणे. किनारपट्टीचा पूर्ण वापर करून हरित व नील अर्थव्यवस्थेवर भर देणे, ऊर्जा साठवण क्षमता वाढवणे आणि २०४७ पर्यंत १०० गिगावॅट अणुऊर्जा क्षमतेचे लक्ष्य ठेवून पुढील ६-७ वर्षांत ५ नवीन अणुभट्ट्या कार्यान्वित करणे. योग, पर्यटन आणि ॲनिमेशन क्षेत्रांच्या माध्यमातून भारताच्या सॉफ्ट पॉवरचे जागतिक स्तरावर प्रदर्शन करणे. (PM Modi Independence Day 2026 Speech)
तरुणांसाठी एआय प्रशिक्षण...
अलीकडेच जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी तरुणांच्या रोजगाराबाबत आणि संधींबाबत महत्त्वाच्या घोषणा केल्या. येत्या वर्षात १ कोटींपेक्षा जास्त तरुणांना 'मिशन मोड'मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून मोफत ऑनलाइन प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाईल. २०३६ च्या ऑलिम्पिक खेळांच्या दृष्टीने देशातील ५ ते १५ वयोगटातील मुलांमधील क्रीडा प्रतिभेचा शोध घेऊन त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल. (PM Modi Independence Day 2026 Speech)
'वैचारिक नक्षलवाद्यां'चा धोका...
सशस्त्र नक्षलवादाचा खात्मा केल्यानंतरही समाजात पसरणाऱ्या वैचारिक धोक्याबद्दल पंतप्रधानांनी देशाला सतर्क केले. "वर्षानुवर्षे माओवादी विचारसरणीच्या लोकांनी सत्तेच्या वर्तुळात जागा बनवून धोरणनिर्मितीवर प्रभाव पाडला होता. जंगलातील सशस्त्र नक्षलवाद्यांचा नायनाट झाला असला, तरी हे वैचारिक नक्षलवादी समाजात अराजकता पसरवण्याची संधी शोधत आहेत. आपण या घटकांना ओळखून वेगळे पाडले पाहिजे," असे पंतप्रधान म्हणाले. (PM Modi Independence Day 2026 Speech)
पुढे ते म्हणाले, आता युद्धे केवळ सीमेपुरती मर्यादित नसून सायबर हल्ल्यांद्वारे डेटा सेंटर, बँकिंग, डेटा नेटवर्क्स आणि तेल शुद्धीकरण कारखान्यांना लक्ष्य केले जाऊ शकते. यासाठी 'मिशन सुदर्शनचक्र' आणि नागरी संरक्षण पायाभूत सुविधांची पूर्ण पुनर्रचना केली जाईल. (PM Modi Independence Day 2026 Speech)
जागतिक मंदी आणि युद्धाच्या काळातही भारताने 'नागरिक देवो भव' या तत्त्वाचे पालन करत अर्थव्यवस्था स्थिर ठेवल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. कोरोना महामारीनंतर सर्वत्र पसरलेल्या अफवा आणि भीतीवर मात करत भारताने इंधन, खत आणि अन्नधान्याची टंचाई भासू दिली नाही, असे सांगत त्यांनी देशाच्या मजबूत धोरणांचे समर्थन केले. (PM Modi Independence Day 2026 Speech)