ठाणे, (Thane Development Eknath Shinde) : ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शासकीय ध्वजारोहण समारंभात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात शिंदे यांनी विकसित भारत २०४७, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, शेतकरी कल्याण, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा आणि ठाणे जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेतला. (Thane Development Eknath Shinde)
भारताची संरक्षण क्षमता आज अधिक मजबूत झाली असून ड्रोन, क्षेपणास्त्रे, सुपरसॉनिक क्रूझ मिसाइल, आधुनिक युद्धनौका आणि इलेक्ट्रॉनिक संरक्षण प्रणालीच्या माध्यमातून देश आत्मनिर्भर होत आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’च्या माध्यमातून भारत संरक्षण उत्पादन क्षेत्रातही सक्षम राष्ट्र म्हणून पुढे येत असल्याचे त्यांनी सांगितले. (Thane Development Eknath Shinde)
नक्षलवादावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात आले असून अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात प्रवेश केला आहे. शांतता, सुरक्षा आणि विकास या त्रिसूत्रीमुळे देशाच्या दुर्गम भागातही विकासाची नवी पहाट उगवत असल्याचे त्यांनी नमूद केले. (Thane Development Eknath Shinde)
महाराष्ट्राची आर्थिक ताकद, संतांची शिकवण, मुंबईची आर्थिक क्षमता, पुण्याचे ज्ञान, विदर्भाची शेती आणि कोकणचे सामर्थ्य यामुळे महाराष्ट्र देशाच्या विकासाचे नेतृत्व करत आहे. देशाच्या वन ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचे योगदान सर्वाधिक असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Thane Development Eknath Shinde)
शेतकरी हा सरकारच्या केंद्रस्थानी असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ लागू करून निवडणुकीतील आश्वासन पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. सिंचन, आधुनिक शेती अवजारे, कृषी तंत्रज्ञान आणि विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर सरकारचा भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Thane Development Eknath Shinde)
नवीन गृहनिर्माण धोरणातून गरीब आणि मध्यमवर्गीयांना परवडणारी घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईसह महाराष्ट्र झोपडपट्टीमुक्त करण्याचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून पुनर्विकासात कोणत्याही रहिवाशावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. (Thane Development Eknath Shinde)
ठाणे शहरातील अंतर्गत मेट्रो, ठाणे-बोरिवली बोगदा, घोडबंदर मार्ग, वाहतूक सुधारणा, पुनर्विकास आणि ओपन स्पेससह नागरिकांना विश्वासात घेऊन राबविण्यात येणारे प्रकल्प ठाण्याचे भवितव्य बदलतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Thane Development Eknath Shinde)
ठाण्यात ९०० खाटांचे राज्यातील मोठे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारले जात असून अत्याधुनिक आरोग्यसेवा नागरिकांना उपलब्ध होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून ३५ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ देण्यात आला असून २६८ जणांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. (Thane Development Eknath Shinde)
कृषी क्षेत्रात ॲग्री-स्टॅक प्रणालीवर ९७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. जिल्हा परिषद योजनांमधून २,१०० लाभार्थ्यांना शेती अवजारे, सिंचन साहित्य, तारेचे कुंपण आणि इतर साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून अनुसूचित जाती-जमातीतील शेतकरी कुटुंबांना मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. (Thane Development Eknath Shinde)
ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा यासाठी ठाणे जिल्हा परिषद शाळेतील १५ विद्यार्थ्यांना इस्रो भेटीची संधी देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. (Thane Development Eknath Shinde)
ठाणे शहरात ६,०५९ एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘आधारवड’ ॲप आणि पोलीस-जनतेतील संवाद वाढविण्यासाठी ‘पोलीस मित्र’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सायबर गुन्ह्यांविरोधातही व्यापक जनजागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. (Thane Development Eknath Shinde)
यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, मनपा आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, पोलीस आणि नागरिक उपस्थित होते. (Thane Development Eknath Shinde)
*जिल्ह्याच्या विकासाचा वेग वाढणार*
“विकसित भारत २०४७ हे केवळ घोषवाक्य नाही, तर १४० कोटी भारतीयांचा संकल्प आहे. शेतकरी, कामगार, महिला, युवक आणि सामान्य नागरिकांच्या सहभागातूनच हा संकल्प पूर्ण होईल. महाराष्ट्र विकसित भारताच्या निर्मितीत अग्रस्थानी असून ठाणे जिल्ह्याच्या विकासाचा वेग आता आणखी वाढणार आहे. नागरिकांच्या जीवनमानात गुणात्मक बदल घडविणाऱ्या प्रकल्पांना सरकार प्राधान्य देत आहे.” (Thane Development Eknath Shinde)
--उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्र्यांचा ठाम शब्द
“ठाण्याच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पात नागरिकांना विश्वासात घेतले जाईल. विकासाच्या नावाखाली कोणत्याही नागरिकावर अन्याय होऊ देणार नाही. प्रत्येकाला न्याय, हक्क आणि सन्मान मिळेल, ही सरकारची भूमिका आहे,” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.(Thane Development Eknath Shinde)