ठाणे, (Dombivli Tricolor Rally) :- स्वातंत्र्य दिनानिमित्त डोंबिवलीत डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि १०० हून अधिक सामाजिक संस्थांच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. तब्बल ३५ हजार चौरस फुटांचा विशाल तिरंगा हजारो विद्यार्थी आणि नागरिकांनी हातात घेऊन मार्गक्रमण केले. या विक्रमी उपक्रमाची World Records India, Asia Book of Records आणि India Book of Records यांच्या अधिकृत नोंद प्रक्रियेत नोंद करण्यात आली.(Dombivli Tricolor Rally)
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हुतात्मा कॅप्टन विनयकुमार सचान स्मारकाला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. लोकमान्य टिळक पुतळा, चार रस्ता, नेरुरकर पथ मार्गे दत्तनगर चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. मुसळधार पावसाची तमा न बाळगता विद्यार्थी, पालक, शिक्षक, माजी सैनिक, एनसीसी-एनएसएस कॅडेट, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.(Dombivli Tricolor Rally)
रॅलीचा समारोप दत्तनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान परिसरातील १५० फूट उंच राष्ट्रध्वज स्तंभाजवळ झाला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देशभक्तीपर घोषणांनी आणि गीतांनी संपूर्ण डोंबिवली परिसर दुमदुमून गेला.(Dombivli Tricolor Rally)
या उपक्रमात ५० हून अधिक शाळांमधील सुमारे १० हजार विद्यार्थी, १०० हून अधिक सामाजिक संस्था आणि सुमारे २५ हजार नागरिक सहभागी झाले. विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थिती लावत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.(Dombivli Tricolor Rally)
पावसाने उत्साह कमी झाला नाही* “मुसळधार पाऊस सुरू असतानाही डोंबिवलीकरांचा तिरंग्याबद्दलचा उत्साह आणि राष्ट्रभक्ती तसूभरही कमी झाली नाही. हजारो विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांनी दाखवलेला हा उत्साह डोंबिवलीच्या राष्ट्रप्रेमाची ताकद दाखवणारा आहे. तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नसून देशाची एकता, अखंडता, त्याग आणि अभिमानाचे प्रतीक आहे. नव्या पिढीने देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले योगदान देण्याचा संकल्प करावा. या विश्वविक्रमी उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थी, संस्था आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार,”(Dombivli Tricolor Rally)
--खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
एक तिरंगा, एक देश, एक अभिमान
३५ हजार चौरस फुटांचा विशाल तिरंगा, हजारो नागरिकांचा सहभाग आणि देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमलेली डोंबिवली! मुसळधार पावसातही नागरिकांचा उत्साह कायम राहिला. या विश्वविक्रमी सोहळ्याने डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.(Dombivli Tricolor Rally)