रांची (Devendranath Mahto Jharkhand Independence Day) : देशभरात शनिवार, दि. १५ ऑगस्ट रोजी ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलनाला नवे वळण प्राप्त झाले. झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चाचे (JLKM) नेते देवेंद्रनाथ महतो यांना रांची येथील जयपाल सिंह मुंडा स्टेडियममध्ये आयोजित तिरंगा यात्रा आणि ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी होण्यापासून पोलिसांनी रोखल्याचा आरोप देवेंद्रनाथ महतो यांनी केला आहे.
महतो यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक व्हिडीओ शेअर करत या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. सध्या ते रांचीच्या सदर रुग्णालयात उपचार घेत आहेत. सदर रुग्णालयाच्या खोलीबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात शांततेच्या मार्गाने सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करूनही आपल्याला बाहेर पडण्यापासून रोखले जात असल्याचा दावा त्यांनी केला. (Devendranath Mahto Jharkhand Independence Day)
झारखंड सरकार का अंहकार
14 दिनों से भूख हड़ताल पर बैठे श्री देवेन्द्र महतो के स्वतंत्रता दिवस पर राष्ट्रीय पर्व मनाने लिए जाते समय उनके साथ पुलिस द्वारा धक्का-मुक्की और बलपूर्वक रोकने की कोशिश अत्यंत दुःखद है। ये राष्ट्र विरोधी कदम है।
महतो यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले की, “हे कसले स्वातंत्र्य आहे? आपल्या देशात तिरंगा फडकवण्याचा आणि तिरंगा यात्रेत सहभागी होण्याचाही अधिकार नाही का?” शांततेच्या मार्गाने कार्यक्रमात सहभागी होण्याची आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. (Devendranath Mahto Jharkhand Independence Day)
JPSC आणि JSSC भरती परीक्षांतील कथित अनियमितता, पारदर्शकतेचा अभाव आणि परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांच्या चौकशीच्या मागणीसाठी झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन सुरू आहे. ६ ऑगस्ट रोजी विधानसभा घेरावाचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रुधुराचा वापर आणि वॉटर कॅननचा मारा केला. या कारवाईत देवेंद्रनाथ महतो जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Devendranath Mahto Jharkhand Independence Day)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.