भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण संपन्न

    15-Aug-2026
Maharashtra Independence Day
 
मुंबई : (Maharashtra Independence Day) भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवार दि.१५ रोजी विविध ठिकाणी ध्वजारोहण संपन्न झाले.विधान भवन, मुंबई येथे विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते, विधानपरिषदेचे उप सभापती सचिन अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
 
या प्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव डॉ.विलास आठवले, सचिव शिवदर्शन साठये, सभापती यांचे सचिव पंडित खेडकर यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी डॉ. राजू भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली. (Maharashtra Independence Day)
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते विधानभवन येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजारोहणानंतर राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, नागरिक तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. (Maharashtra Independence Day)
 
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विरधवल जगदाळे, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार डॉ.निलमताई गोऱ्हे, बापूसाहेब पठारे, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले , पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, यांच्यासह सैन्यदलातील अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, नागरिक तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते. (Maharashtra Independence Day)
 
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. (Maharashtra Independence Day)
 
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार झीशान सिद्दीकी, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस उपायुक्त निमित गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, उपजिल्हाधिकारी सुभाष काकडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व स्वातंत्र्य सैनिक, शहीद सैनिकांचे कुटुंबीय, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक आदी यावेळी उपस्थित होते. (Maharashtra Independence Day)
 
पालकमंत्री ॲड. आशिष शेलार व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते, दक्षिण आफ्रिकेतील ९० किमी अंतराची 'द अल्टिमेट ह्युमन रेस' नावाने ओळखली जाणारी खडतर मॅरेथॉन स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल तहसीलदार युवराज बांगर यांचा तसेच गुणवंत विद्यार्थी व गुणवंत कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. (Maharashtra Independence Day)
 
पालकमंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी स्वातंत्र्य सैनिक, शहीद सैनिकांचे कुटुंबीय, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विकसित भारत २०४७ संकल्पात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
 
वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा पार पडला. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मनोगत व्यक्त केले. या सोहळ्यात विविध देशांचे राजदूत, उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि अधिकाऱ्यांनी भारताचे स्वातंत्र्य, एकता आणि राष्ट्रीय अभिमानाचा जयघोष केला. या सोहळ्यास वर्ल्ड ट्रेड सेंटरचे पदाधिकारी तसेच श्रीलंका, इंडोनेशिया, ब्राझील, जपान, चीन यांसह अनेक देशांचे राजदूत आणि कॉन्सुलर प्रतिनिधी उपस्थित होते. (Maharashtra Independence Day)
 
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्च न्यायालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. (Maharashtra Independence Day)
 
यावेळी वंदे मातरम्, राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन करून पोलीस पथकाने राष्ट्रीय ध्वजास सलामी दिली. यावेळी अमृता फडणवीस तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. (Maharashtra Independence Day)
 
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रीय ध्वजास सलामी दिली. (Maharashtra Independence Day)
 
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना 'विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत' घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात शासकीय दवाखान्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. (Maharashtra Independence Day)
 
यावेळी अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शिवनंदा लंगडापूरे, उपजिल्हाधिकारी संजय पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे, उपजिल्हाधिकारी (अति./निष्का.) प्रशांत पानवेकर, उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (Maharashtra Independence Day)
 
 
 
 




संबंधित मजकूर