राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांचाच; खा. सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

    14-Aug-2026   
NCP Belongs To Sharad Pawar
 
मुंबई : (NCP Belongs To Sharad Pawar) शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आहेत. राष्ट्रवादीचे जे संविधान आहे, त्यामध्ये आमदार आणि खासदार याचे मतदान नाही. पण पक्ष ज्याचा आहे, त्यांच्याकडेच राहील, अशी तरदूत आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या प्रकरणात राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार यांचाच आहे, तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही आहे, या संदर्भातील सर्व पुरावे आम्ही न्यायालयात सादर केले आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खा. सुप्रिया सुळे यांनी दिली.
 
पत्रकार परिषदेत बोलताना खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना फोडले गेले, ते अयोग्यच आहे. कुठल्याही संविधानाच्या चौकटीमध्ये ते बसत नाही. हे आमच्या विरोधकांनाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे. ज्या पद्धतीने त्या गोष्टी झाल्या त्या अमान्य आहेत. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचा गैरवापर झाला, ते सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे. निवडणूक आयोगाने आमच्यावर अन्याय केला, हे मी जड अंतकरणाने म्हणते. दुर्दैवाने निवडणूक आयोगाने अतिशय चुकीच्या पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अन्याय केला." (NCP Belongs To Sharad Pawar)
 
"शिवसेना ही काल, आज आणि उद्या उद्धव ठाकरे यांचीच असणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी तो पक्ष स्थापन केला. ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धव ठाकरे यांच्या हातात दिला. त्यामुळे शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे. समजा एखाद्याचे काही वेगळे मत असल्यास त्यांनी राज ठाकरे यांच्याप्रमाणे वेगळी चूल मांडायला हवी होती. स्वत:च्या कर्तृत्वावर पक्ष उभा करावा. आमच्या पक्षाच्या सुनावणीसाठी अजूनही तारीख मिळत नाही. शरद पवार यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतला. शिवसेना आणि राष्ट्रवादी ही दोन्ही प्रकरणे एकत्र करा, अशी आमची मागणी आहे. जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी ही लढाई लढतच राहणार आहे. शरद पवार यांना रीतसर त्यांचा पक्ष मिळावा ही आमची मागणी आहे. त्यानंतर ते तो पक्ष कुणाकडे द्यावा, हा अधिकार त्यांचा आहे," असेही त्या म्हणाल्या. (NCP Belongs To Sharad Pawar)
 
एफसीआरए विधेयकावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन ॲक्ट (एफसीआरए विधेयक) भारत सरकारने आणले आहे. परदेशातून एनजीओंना येणाऱ्या पैशांबाबतची यंत्रणा म्हणजे हे विधेयक आहे. अनेक दशके एफसीआरएचे एक खाते तयार करायचे असते त्यातून परदेशातून निधी येतो. शिक्षण किंवा आरोग्य सेवेच्या कामासाठी आपल्या देशात परदेशातून निधी येतो. (NCP Belongs To Sharad Pawar)
 
एफसीआरए या संकल्पनेतून या सगळ्या चांगल्या कामांसाठी निधी यायचा. सरकारला यात काही गैर वाटत असल्यास मनापासून दानधर्म करणाऱ्या प्रत्येकाकडे आपण वाईट नजरेने का बघावे? अनेक वर्षांपासून ही यंत्रणा सुरु आहे. यात सुधारणा करण्यास आमचा विरोध नाही. पण ज्या स्वरूपात ते विधेयक आहे, त्याला आमचा विरोध होता. त्यामुळे इंडिया आघाडीच्या सर्व मित्रपक्षांनी या विधेयकाला विरोध केला. त्यामुळे संयुक्त संसदीय समितीकडे हे विधेयक पाठवण्यात आले. या समितीमध्ये आमचा पक्षही सहभागी राहणार आहे. आजपर्यंत प्रत्येक संसदीय समितीमध्ये आमच्या पक्षाची नेहमी सकारात्मकच भूमिका राहिली आहे. देशाच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी आमची सकारात्मकच भूमिका आहे." (NCP Belongs To Sharad Pawar)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर