मुंबई, (Mahatma Jyotirao Phule Revenue Lok Adalat): क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून महसूल विभागाने दि. १ सप्टेंबर २०२६ ते दि. ३१ मार्च २०२७ या सात महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान' राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.(Mahatma Jyotirao Phule Revenue Lok Adalat)
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून, यामुळे लाखो पक्षकारांना अर्धन्यायिक न्यायालयांच्या फेऱ्या आणि वेळ यात मोठा दिलासा मिळणार आहे. गुरुवारी, महसुल विभागाच्या वतीने याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.(Mahatma Jyotirao Phule Revenue Lok Adalat)
या अभियानांतर्गत महसूल प्रशासनातील सर्वात खालच्या स्तरापासून ते वरिष्ठ स्तरापर्यंतच्या सर्व अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या सर्व प्रकारच्या महसुली दाव्यांचा आणि अपीलांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), अपर जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयांतील प्रलंबित दाव्यांचा तडजोडीने निपटारा केला जाईल.(Mahatma Jyotirao Phule Revenue Lok Adalat)
दर तीन महिन्यांनी 'लोक अदालत' बंधनकारक
या अभियानादरम्यान दर तीन महिन्यांतून एकदा मंडळ अधिकारी ते जिल्हाधिकारी अशा सर्व स्तरांवर 'महसूल लोक अदालत' आयोजित करणे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे.(Mahatma Jyotirao Phule Revenue Lok Adalat)
अभियानाची कार्यपद्धती
प्रलंबित दाव्यातील दोन्ही पक्षकार किंवा त्यांचे वकील संयुक्तपणे 'प्रपत्र-अ' मधील विहित नमुन्यात तडजोडीसाठी अर्ज सादर करतील. प्राप्त अर्जांची छाननी करून दोन्ही पक्षांच्या इच्छेनुसार कायदेशीर तडजोडनामा तयार केला जाईल. ठरवून दिलेल्या लोक अदालतीच्या दिवशी दोन्ही बाजूंच्या संमतीने अंतिम आदेश पारित करून प्रकरण कायमस्वरूपी निकाली काढले जाईल.(Mahatma Jyotirao Phule Revenue Lok Adalat)
तिमाही आढावा
अभियानाचा लाभ राज्यातील शेवटच्या घटकांपर्यंत आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी सर्व तहसील, उपविभाग व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळांवर आणि फलकांवर माहिती प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी कार्यालयांतही याचे फलक लावण्यात येतील. अभियानाच्या अंमलबजावणीचा त्रैमासिक अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत शासनाला सादर केला जाणार आहे.(Mahatma Jyotirao Phule Revenue Lok Adalat)
"सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हेच महात्मा फुले यांच्या विचारांचे मूळ सूत्र होते. लोक अदालतीच्या माध्यमातून दाव्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघाल्यामुळे वकिलांचा खर्च, न्यायालयाचे खटले आणि मानसिक त्रास यातून नागरिकांची सुटका होईल."(Mahatma Jyotirao Phule Revenue Lok Adalat)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....