‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा -मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

    14-Aug-2026
Maha Walkathon Walk For Water
 
मुंबई : (Maha Walkathon Walk For Water) "मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन निमित्ताने राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर, जलसंधारणाची शपथ, युवकांसाठी लघुचित्रफीत स्पर्धा, शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.यात सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड तयार करण्यात आला असून हा क्यूआर कोड स्कॅन करुन नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा."असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी शुक्रवार दि.१४ रोजी केले आहे.(Maha Walkathon Walk For Water)
 
जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले, " २१ ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉन मध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र मिळणार आहे. मीडियासाठी #MahaWalkathon, #WalkForWater, #SaveSoilSave Water हे हॅशटॅग वापरण्यात यावे. १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह आणि त्यानंतर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत जलसंधारण अभियान राबविण्यात येणार आहे."(Maha Walkathon Walk For Water)
 
जलसंधारण सप्ताह दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यात मृद व जलसंवर्धन ‘रील्स स्पर्धाचे ‘आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींच्या कल्पकतेचा उपयोग करुन इन्स्ट्राग्रामच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी "Reel for Soil and Water Conservation" स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याची थीम सेव्ह वॉटर, सेव्ह सोईल , सेव्ह वॉटर सिक्युअर टूमारो अशी असून सोशल मीडियावर #SaveSoil Save Water हे हॅशटॅग वापरण्यात यावे. यामुळे एकाच हॅशटॅगखाली विक्रमी संख्येने रील्स तयार होऊन मोठ्या डिजिटल सहभागाची नोंद होणार असल्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.(Maha Walkathon Walk For Water)
 
या स्पर्धेचा पात्र वयोगट १५ ते ३० वर्षे असा ठेवण्यात आला आहे. प्रत्येक स्पर्धकाने ३० ते ६० सेकंदांची इंस्टाग्राम रिल तयार करावी. व्हिडीओ/ रीलच्या सुरुवातीला व्हिडीओ / रीलचा उद्देश, स्वतःचे संपूर्ण नाव, जिल्ह्याचे नाव नमूद सहभागी स्पर्धकांनी करणे आवश्यक आहे. स्पर्धाकाने रील स्वतःच्या पब्लिक इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट करावी. स्पर्धकांनी मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट ला टॅग करणे बंधनकारक राहील. यासाठी अधिकृत हॅशटॅग #Save Soil Save Water वापरणे अनिवार्य राहणार आहे.(Maha Walkathon Walk For Water)
 
मृद व जलसंधारण विभागाचे Instagram – https://www.instagram.com/mahawalkathon2026/?hl=en , Facebook - https://www.facebook.com/mahawalkathon2026/, Twitter https://x.com/MahaWalkathon26 सोशल मीडिया अकाऊंट आहेत असे त्यांनी सांगितले.(Maha Walkathon Walk For Water)
 
 




संबंधित मजकूर