कोकण प्रांतात एकाचवेळी दहा ठिकाणी होणार घोषवादन!

राष्ट्र सेविका समितिच्या ९० व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘स्वरतरंगिणी’चे आयोजन

    14-Aug-2026   

National Service Committee
 
 
मुंबई (National Service Committee) : राष्ट्र सेविका समितिच्या ९० व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून कोकण प्रांताच्या वतीने विशेष ‘स्वरतरंगिणी’ घोषवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. १६ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ६.३० या वेळेत कोकण प्रांतातील नऊ जिल्हे आणि एका महानगरातून साखळी पद्धतीने घोषवादन करण्यात येणार आहे.(National Service Committee)
 
या विशेष उपक्रमांतर्गत कोकण प्रांतातील दहा ठिकाणी घोषवादनाचे आयोजन करण्यात आले असून, विविध ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांवरून कार्यक्रम सादर केला जाणार आहे. उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात आंजर्ले येथील वं. सरस्वतीबाई आपटे जन्मस्थान व कड्यावरील गणपती देवस्थान, दक्षिण रत्नागिरीत पतित पावन मंदिर-रत्नागिरी, सिंधुदुर्गात मालवण येथील राजकोट, गोव्यात वेर्णा येथील महालसा नारायणी मंदिर येथे घोषवादन होईल.(National Service Committee)
 
याशिवाय वसईतील आगाशी नाका येथील श्री भवानी शंकर मंदिर, रायगडमधील खालापूर येथील वीरेश्वर मंदिर, डोंबिवली पश्चिम येथील आन ठाकूर मान ठाकूर उद्यान, बोरीवली येथील वीर सावरकर उद्यान, ठाणे महानगरातील कोलशेत खाडी तसेच मुंबईतील दादर पश्चिम येथील सावरकर स्मारक समिती येथेही घोषवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.(National Service Committee)
 
‘स्वरतरंगिणी’ या उपक्रमातून कोकण प्रांतातील विविध भागांतील घोषवादनाची एकसंध साखळी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला नागरिकांनी आपल्या जवळच्या ठिकाणी उपस्थित राहून सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. दरम्यान, प्रत्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित राहता न येणाऱ्या नागरिकांसाठी या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण समिति संवाद-कोकण प्रांत’ या अधिकृत फेसबुक पेजवर करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना ऑनलाइन माध्यमातूनही ‘स्वरतरंगिणी’ कार्यक्रमाचा अनुभव घेता येईल.(National Service Committee)
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर