इनाम देवस्थान जमिनींच्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासन प्रयत्नशील; २ लाख ३१ हजार प्रकरणांपैकी ६० हजारांवर मार्ग;

उर्वरित शेतकऱ्यांसाठी महिनाभरात तोडगा काढणार ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे संकेत

    14-Aug-2026
Inam Devasthan Land Farmers
 
नागपूर : (Inam Devasthan Land Farmers) कायदेशीर अडचणींमुळे प्रॉपर्टी कार्ड आणि सातबारा उतारा मिळू न शकलेल्या इनाम देवस्थान जमिनीवरील शेतकऱ्यांना पीक विमा, पीक कर्जासह आवश्यक शासकीय सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन पुढाकार घेत आहे. २ लाख ३१ हजार प्रकरणांपैकी आतापर्यंत ६० हजारांहून अधिक प्रकरणांवर मार्ग काढण्यात आला असून, उर्वरित सुमारे १ लाख ६० हजार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही पुढील महिनाभरात तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे महसूलमंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
 
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रसारमाध्यमांशी नागपुरात बोलत होते. (Inam Devasthan Land Farmers)
 
विविध भागांत जमिनींच्या स्वरूपानुसार वेगवेगळे कायदे आणि नियम लागू आहेत. पालघर-ठाणे येथे ‘वर्कर्स’, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कबुलायतदार’, मराठवाड्यात निजामाच्या जमिनी, नंदुरबारमध्ये जहागीरदारांच्या जमिनी, तर पश्चिम महाराष्ट्रात देवस्थान इनाम व देशमुख इनाम अशा विविध प्रकारच्या जमिनी आहेत. या सर्व प्रकरणांचा अभ्यास करून आवश्यक त्या कायद्यात बदल करण्याची शासनाची भूमिका आहे. (Inam Devasthan Land Farmers)
 
शेतकरी कसत असलेल्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द आहे, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. (Inam Devasthan Land Farmers)
 
आदिवासी शेतकऱ्यांना नवीन सातबारा देण्याच्या प्रक्रियेमुळे त्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर होण्याचा मार्ग मोकळा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
टीका करून काही साध्य होणार नाही. (Inam Devasthan Land Farmers)
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करून काही साध्य होणार नाही. देशाच्या सुरक्षेसाठी अमित शाह यांनी मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांवर टीका करायची असेल तर त्याला अर्थ असलेली आणि तथ्याधारित टीका झाली पाहिजे, असे ते म्हणाले. (Inam Devasthan Land Farmers)
 
ओबीसी संघटनांना आंदोलन टाळण्याचे आवाहन
 
ओबीसी संघटनांकडून सुरू असलेल्या आंदोलनांबाबत बावनकुळे म्हणाले की, या विषयावर आपण कालच भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, ओबीसी संघटनांना माध्यमांच्या माध्यमातून माझी विनंती आहे की, रस्त्यावरचे वाद, मोर्चे आणि आंदोलनांमुळे राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडणे योग्य नाही. समाजा-समाजात वाद निर्माण होणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे कोणत्याही ओबीसी संघटनेने आंदोलन किंवा मोर्चे काढू नयेत, असे आवाहन त्यांनी केले.
 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नागपूर दौऱ्यात पक्षाच्या सोशल मीडिया यंत्रणेला अधिक सक्षम करण्याबाबत केलेल्या सूचनेचे स्वागत करताना बावनकुळे म्हणाले की, प्रदेशाध्यक्षांनी योग्य सल्ला दिला आहे. सोशल मीडिया, रील्स आणि बदलत्या अल्गोरिदमचा प्रभाव लक्षात घेऊन पक्षाने पुढे जाणे आवश्यक आहे. प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या सूचनांचे आम्ही सर्वजण पालन करू. (Inam Devasthan Land Farmers)
 
भाजप-शिवसेना युती गेल्या ३० वर्षांपासून असून, दोन्ही पक्षांनी एकमेकांना भावा-भावाप्रमाणे सांभाळले आहे. त्यामुळे काही वक्तव्ये कोणत्या उद्देशाने केली आहेत, याबाबत मला माहिती नाही; मात्र संबंधितांशी याबाबत चर्चा करणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. (Inam Devasthan Land Farmers)
 
 




संबंधित मजकूर