पुणे : (Chakan MIDC Problems) चाकण एमआयडीसीतील रस्ते, वाहतूक कोंडी आणि इतर पायाभूत सुविधासंबंधी अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येतील. यासाठी चाकण येथील उद्योजक, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक व जिल्हा प्रशासनासोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. (Chakan MIDC Problems)
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी चाकण नागरी कृती समिती व औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी धनंजय शेडबाळे यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. यावेळी उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्याबाबत त्यांना आश्वस्त केले. (Chakan MIDC Problems)
या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्र्यांनी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, खेडचे प्रांत अधिकारी अनिल दौंडे आणि चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. (Chakan MIDC Problems)
लवकरच सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन या समस्यांवर मार्ग काढण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Chakan MIDC Problems)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....