बाल भिक्षेकरी मुलांच्या पुनर्वसनासाठी ३१ फिरती पथके कार्यान्वित करणार – आदिती तटकरे

    13-Aug-2026   
Women and Child Development Minister Aditi Tatkare
 
मुंबई: ( Women and Child Development Minister Aditi Tatkare) बाल भिक्षेकरी समस्येचे समूळ उच्चाटन करून या बालकांच्या पुनर्वसनासाठी राबविण्यात येणारी फिरते पथक योजना जलदगतीने कार्यान्वित करण्यात येणार असून, त्यासाठी राज्यातील २८ महानगरपालिका क्षेत्रांसह मुंबई महानगर क्षेत्रात एकूण ३१ फिरती पथके कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
 
या संदर्भात मंत्रालयात आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत बाल भिक्षेकरी मुलांच्या पुनर्वसनासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. राज्यातील २८ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये प्रत्येकी एक फिरते पथक तसेच बृहन्मुंबई शहर, मुंबई उपनगर पूर्व आणि मुंबई उपनगर पश्चिम या क्षेत्रांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र पथक कार्यान्वित करण्यात येणार आहे. ( Women and Child Development Minister Aditi Tatkare)
 
या पथकांच्या निवड प्रक्रियेसह आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करून योजना प्रत्यक्षात सुरू करण्याचे निर्देश आदिती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ( Women and Child Development Minister Aditi Tatkare)
 
बैठकीस महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
( Women and Child Development Minister Aditi Tatkare)
 
 




सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.
संबंधित मजकूर