बस्तर सफारी ठरली शेवटची राइड! २४ वर्षीय बाईकर रिद्धी ठक्करचा भीषण अपघातात मृत्यू, नेमकं काय घडलं?


मुंबई: (Riddhi Thakkar Bike Accident) इन्स्टाग्रामवरील प्रसिद्ध कंटेंट क्रिअटर आणि बाईकर, २४ वर्षीय रिद्धी दिव्येश ठक्कर ही तरुणी महाराष्ट्रातून छत्तीसगडच्या बस्तर सफारीवर निघालेली असताना रस्ते अपघातात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धमतरी आणि बालौद जिल्ह्याच्या सीमेवरील जगतरा दरी परिसरात एका अज्ञात वाहनाने रिद्धीच्या बाईकला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात रिद्धीचा दुर्दैवी मृत्यू झाला. (Riddhi Thakkar Bike Accident)


माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील विविध भागांतील २३ महिला बायकर्सचा ग्रुप एकत्र आला होता. ज्यात २० बाईक आणि एक कार होती. सर्व बाईकर्स रायपूरला एकत्र भेटून बस्तरसाठी रवाना झाल्या होत्या. प्रवासाला निघायच्या अवघ्या १५ तासांपूर्वी रिद्धीने इन्स्टाग्राम Let's Explore Bastar अशी स्टोरी टाकली होती. मात्र बुधवारी १२ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास जगतरा दरीतील वळणावर एका अज्ञात अवजड वाहनाने रिद्धीच्या बाईकला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भयंकर होता की, रिद्धीला गंभीर दुखापत झाली. अपघात होताच अज्ञान वाहन चालक काही क्षणातच अपघात स्थळावरून पसार झाला. दरम्यान रिद्धीसोबत असलेल्या तिच्या बाईकर्स सहकाऱ्यांनी तिला तातडीने रूग्णालयात हलवले. मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी तिली मृत घोषित केले. (Riddhi Thakkar Bike Accident)
रिद्धी एक बाईकर होती. मात्र सोबतच एक कंटेंट क्रिएटर देखील होती. तिला बाइकिंग आणि लांब पल्ल्याच्या राइडिंगची विशेष आवड होती. ती तिच्या प्रवासाचे फोटोस आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर शेअर करायची. इन्स्टाग्रामवर तिचे १९.८ हजार फोलोअर्स आहेत. आता तिच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे बाईकिंग कम्युनिटी आणि तिच्या फोलोअर्सकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताचा पुढील पोलीस तपास सुरू असून लवकराच आरोपी पकडला जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. (Riddhi Thakkar Bike Accident)






मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर