मुंबई : (Financial Assistance For Children In Mumbai) मुंबई शहर जिल्ह्यातील विविध बालगृहांमध्ये वास्तव्यास असलेल्या दोन्ही पालक किंवा एका पालकाला गमावलेल्या २५ बालकांना रिक्ता फाउंडेशनच्या वतीने प्रत्येकी २० हजार रुपयांची आर्थिक मदत मुदत ठेव (एफडी) स्वरूपात देण्यात आली. या बालकांच्या नावाने पोस्ट विभागामध्ये उघडण्यात आलेल्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटच्या पासबुकांचे वितरणही यावेळी करण्यात आले.
महिला व बालविकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई शहर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून आणि निर्देशानुसार संस्थांमध्ये राहणाऱ्या बालकांना वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वावलंबी होण्यासाठी आर्थिक आधार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. (Financial Assistance For Children In Mumbai)
मुंबई शहर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि रिक्ता फाउंडेशन, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मानव सेवा संघ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात लाभार्थी बालकांना नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटची पासबुकांचे वितरण करण्यात आले. (Financial Assistance For Children In Mumbai)
यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार, मुंबई शहर बालकल्याण समितीचे अध्यक्ष महादेव सावंत, रिक्ता फाउंडेशन, दिल्लीचे संस्थापक के. पोर्थो, विश्वस्त अरुणा चक्रवर्ती तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी-कर्मचारी, श्री मानव सेवा संघ, श्रद्धानंद, आशा सदन आणि सेंट जोसेफ संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (Financial Assistance For Children In Mumbai)