'मातंग समाजातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा' : सुनील वारे

    13-Aug-2026   

(FreeCompetitive Exam Training For Matang Students)
 
मुंबई : (Free Competitive Exam Training For Matang Students) महाराष्ट्र शासनाच्या अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) मार्फत राज्यातील मातंग व तत्सम जातींमधील विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, रेल्वे, एसएससी, एलआयसी, नाबार्ड, पोलीस व सैन्य भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांच्या नि:शुल्क पूर्व प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी केले आहे.
 
या प्रशिक्षणासाठी दिल्ली तसेच महाराष्ट्रातील नामांकित संस्थांमार्फत सहा ते अकरा महिन्यांचे निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना दरमहा १० ते १३ हजार रुपये विद्यावेतन तसेच पुस्तके व इतर शैक्षणिक खर्चासाठी १३ ते १८ हजार रुपयांचे एकरकमी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. (Free Competitive Exam Training For Matang Students)
 
अनुसूचित जातीतील मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग-गारोडी, मांग-गारुडी, मादगी व मादिगा या समाजातील पदवीधर उमेदवार या योजनेसाठी पात्र असून, ऑनलाइन अर्जानंतर सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.(Moffat competitive Exam Training For Matang Students)
 
इच्छुक उमेदवारांनी http://articet2026.cbtexam.in या अधिकृत संकेतस्थळावर २३ ऑगस्ट पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन सुनील वारे यांनी केले आहे. (FreeCompetitive Exam Training For Matang Students)
 
 




सागर देवरे

सागर देवरे, सामाजिक न्याय प्रतिनिधी, दैनिक मुंबई तरुण भारत.
शिक्षण : बी.ए. एल.एल.बी. (अभ्यासक्रम सुरू).
सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून विविध सामाजिक, शैक्षणिक व अन्य चळवळींवर वृत्तांकनाचा अनुभव.
समुदायाधारित प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन.
सामाजिक न्याय, हिंदू बहुजन समाजाचे प्रश्न व विद्यार्थी चळवळींवर विशेष लेखन.
संबंधित मजकूर