मुंबई : (Independence Day 2026 Flag Hoisting) भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार असून जिल्हा मुख्यालयात संबंधित पालकमंत्री व मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी केले आहे. राज्याचा मुख्य शासकीय समारंभ मंत्रालय, मुंबई येथे सकाळी ९.०५ वाजता होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. तर पुणे येथे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये संबंधित पालकमंत्री व मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ठाणे), उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (बीड), चंद्रशेखर बावनकुळे (नागपूर), राधाकृष्ण विखे-पाटील (अहिल्यानगर), हसन मुश्रीफ (नंदुरबार), चंद्रकांत पाटील (सांगली), गणेश नाईक (पालघर), गुलाबराव पाटील (जळगाव), दादाजी भुसे (अमरावती), संजय राठोड (यवतमाळ), उदय सामंत (रत्नागिरी), जयकुमार रावल (धुळे), पंकजा मुंडे (जालना), अतुल सावे (नांदेड), डॉ. अशोक वुईके (चंद्रपूर), शंभुराज देसाई (सातारा), ॲड. आशिष शेलार (मुंबई उपनगर), दत्तात्रय भरणे (वाशिम), शिवेंद्रसिंह भोसले (लातूर), जयकुमार गोरे (सोलापूर), नरहरी झिरवाळ (हिंगोली), संजय शिरसाट (छत्रपती संभाजीनगर), प्रताप सरनाईक (धाराशिव), मकरंद जाधव (पाटील) (बुलढाणा), नितेश राणे (सिंधुदुर्ग), आकाश फुंडकर (अकोला), प्रकाश सुशिला आनंदराव आबिटकर (कोल्हापूर), आशिष जयस्वाल (गडचिरोली), माधुरी मिसाळ (भंडारा) डॉ. पंकज भोयर (वर्धा), मेघना साकोरे-बोर्डीकर (परभणी) तसेच इंद्रनील नाईक (गोंदिया) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. (Independence Day 2026 Flag Hoisting)
रायगडमध्ये भरत गोगावलेंच्या हस्ते ध्वजारोहण
गेल्या काही वर्षांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही असलेल्या भरत गोगावले यांना यंदा रायगड येथे ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली आहे. तर, नाशिकमध्ये मंत्री गिरीष महाजन ध्वजारोहण करतील. (Independence Day 2026 Flag Hoisting)
तसेच कोकण विभागीय आयुक्त कार्यालय येथे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. पालकमंत्री अथवा मंत्री अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत तर विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्त आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. (Independence Day 2026 Flag Hoisting)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....