म. वा. देसाई रुग्णालयातील आरोग्यसेवेचा आरोग्य समिती अध्यक्षांकडून आढावा

    13-Aug-2026
 
BMC Hospital
 
 मुंबई : (Hospital) मालाड पूर्व येथील म. वा. देसाई रुग्णालयातील वैद्यकीय सेवा आणि अपुऱ्या मनुष्यबळाबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी आज रुग्णालयाला भेट देऊन संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. 
 
यावेळी रुग्णालयातील ICU, एक्स-रे विभाग तसेच विविध वैद्यकीय विभागांची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील उपलब्ध सुविधा, कामकाजाची पद्धत आणि रुग्णांना मिळणाऱ्या सेवांचा आढावा घेण्यात आला. तसेच रुग्णालयातील कमी मनुष्यबळामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत डॉक्टर आणि संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.(Hospital)
 
रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्या प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, याबाबतही डॉक्टरांशी चर्चा करून रुग्णांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. रुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार मिळणे आवश्यक असून, अपुऱ्या स्टाफमुळे रुग्णसेवेवर परिणाम होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. (Hospital)
 
रुग्णालयातील विविध वैद्यकीय विभागांमध्ये उपलब्ध मनुष्यबळ, आवश्यक सुविधा आणि रुग्णसेवेतील त्रुटी यांचा आढावा घेऊन आरोग्य यंत्रणेतील अडचणी दूर करण्यासाठी लवकरच आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे यावेळी सांगण्यात आले. नागरिकांना तत्पर, दर्जेदार आणि प्रभावी वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यावर भर देण्यात येणार आहे. (Hospital)
 
यावेळी मुंबई भाजपाचे महासचिव विनोद शेलार, रुग्णालयाच्या अधिष्ठात्री डॉ. प्रज्ञा, भाजपाचे विविध पदाधिकारी तसेच रुग्णालयातील डॉक्टर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. (Hospital)
 
 




संबंधित मजकूर