कल्याणमध्ये एक जीबीएसचा संशयित रुग्ण आढळून असून त्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी दिली.
Read More
बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचा प्रताप; विधान परिषदेत पडसाद, निलंबनाची कारवाई छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शाळा आणि रुग्णालयाच्या बांधकामापूर्वीच ठेकेदाराला दीड कोटी वाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विधान परिषदेत त्याचे पडसाद उमटले असून, प्राथमिक चौकशीअंती दोषी आढळलेल्या शाखा अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यांत खातेनिहाय चौकशी पूर्ण करून तथ्यांनुसार पुढील कारवाई करण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवार, दि. ७ जुलै रोजी दिले.
गुरुवारी (०३ जुलै) विधिमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी कांदिवली पूर्वेचे आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सत्रादरम्यान अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केले, “महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्यातल्या रुग्णालयांची संख्या आपण वाढवण्याच्या आपण प्रयत्नात आहात हे कधी पर्यंत वाढणार?”
एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची अत्यंत दुरावस्था आहे. तालुका स्तरावर मोठ्या प्रमाणावर एसटी कर्मचारी आहेत. त्यामुळे तालुका-जिल्ह्याच्या ठिकाणी मोठी रुग्णालये आहेत का? की तकलादू छोटे-छोटे उपचार करणार आहोत, असा प्रश्न आ. प्रविण दरेकर यांनी प्रश्नोत्तराच्या चर्चेवेळी उपस्थित केला. त्याला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक उत्तर दिले.
द्यकीय गर्भपात कायद्याअंतर्गत(एमटीपी) एका ३१ वर्षाच्या अविवाहित महिलेने २५ आठवड्यांच्या गर्भाचा गर्भपात करण्यास परवानगी मिळवण्या मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मंगळवार दि.२४ जून रोजी गर्भपात करण्यास सहमती दर्शवली आहे. याचिकाकर्ता, गर्भवती महिला जोडीदाराने साथ सोडल्यामुळे समाजाच्या भीतीने हतबल झाली होती. यात जोडीदाराला न्यायालयाने दोषी ठरवत याचिकाकर्त्याच्या वैद्यकीय आणि कायदेशीर खर्चासाठी तिच्या खात्यात एक लाख रुपये जमा करण्याचा आदेश दिला आहे.
मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातात ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या घटनेतील जखमींना उपचारासाठी कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी कळवा रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर येथील २०० खाटांच्या रुग्णालयासाठी करोडी येथील १५ एकर गायरान जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी देण्यात आली.
साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जीवनात अंगिकारता आल्यास कुठलाच आजार होऊ शकत नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सोमवार, २ जून रोजी नाशिक येथे श्री साईबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट इन्स्टिट्यूट ॲण्ड रिसर्च सेंटरचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे 'श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल'चे उदघाटन केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेच्या ढासळलेल्या स्थितीमुळे नुकत्याच चौदा वर्षाच्या बालकाच्या सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी आज दुपारी उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देत तेथील आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेतला.
( Annual program for patients with Wilson's disease at KEM Hospital Pune ) विल्सन डिसीज असलेल्या रूग्णांचे नियमित देखभाल आणि वेळेवर निदान व उपचार आणि औषधोपचारातील सातत्य ही या मुलांच्या चांगल्या भविष्याची गुरुकिल्ली आहे,असे मत विविध तज्ज्ञांनी व्यक्त केले. केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे नुकतेच विल्सन डिसीजने ग्रस्त असलेले रुग्ण आणि त्यांच्या पालकांसाठी वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गाझातील खान युनूस शहरात इस्रायली लष्कराने एका युरोपियन रुग्णालयावर हल्ला केला. या हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये रुग्ण, वैद्यकीय कर्मचारी आणि सामान्य नागरिकांचाही समावेश आहे. इस्रायलने मंगळवार, ३ मे रोजी हा हल्ला केला. इस्रायली लढाऊ विमानांनी एकूण सहा बॉम्ब टाकले.
सर जे. जे. रुग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी इमारतीचे काम गतीने पूर्ण करा, असे निर्देश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंगळवार, १३ मे रोजी दिले. सर जे.जे. वैद्यकीय महाविद्यालय येथे भेट देऊन त्यांनी रुग्णालयाची पाहणी केली आणि त्यानंतर आढावा बैठक घेतली.
राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा प्रश्न चिघळलाय. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये, मनोरुग्णालये आणि कामगार रुग्णालयांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे राज्यअध्यक्ष भाऊसाहेब पठाण आणि सरचिटणीस बाळाराम सावर्डेकर यांच्या नेतृत्वात आझाद मैदानात एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.
(Governor inaugurates refurbished Aditya Jyot Eye Hospital) महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मंगळवार, दि. २९ एप्रिल रोजी वडाळा, मुंबई येथील नव्याने अद्ययावत करण्यात आलेल्या आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी यावेळी आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक पद्मश्री डॉ. एस. नटराजन, डॉ. अग्रवाल्स ग्रुप ऑफ आय हॉस्पिटल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आदिल अग्रवाल, मुख्य धोरण अधिकारी डॉ. वंदना जैन, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे तसेच आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे डॉ
(KEM Hospital) मुंबईतील केईएम रुग्णालयात ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना’ (MJPJAY) आणि ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’(AB-PMJAY)अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण अशा नोंदणी कक्षाचे उद्घाटन मंगळवार, दि. २३ एप्रिल रोजी करण्यात आले. या कक्षामार्फत रुग्णांना शासकीय योजनेंतर्गत अधिक दर्जेदार व मोफत आरोग्यसेवा मिळणार आहे.
राज्यातील धर्मादाय रूग्णालयांकडून निर्धन, गरीब रूग्णांवर उपचार मोफत व्हावेत. रूग्णालयांनी शिल्लक खाटा, निर्धन रूग्ण निधींची माहिती (आयपीएफ) ऑनलाईन प्रणालीत नोंद करावी. काही रूग्णालयात अनामत रक्कम घेतल्याशिवाय उपचार केले जात नसल्याच्या तक्रारी येतात . या सर्व बाबींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा धर्मादाय रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी धर्मादाय आयुक्त, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या समन्वयातून विशेष तपासणी पथक तयार करण्याचे निर्देश बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी दिल
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सोमवार, २१ एप्रिल रोजी याबद्दलचा शासन निर्णय जारी करण्यात आला. याद्वारे धर्मादाय रुग्णालयांना ८ महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रृत घैसास यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूला जबाबदार धरत त्यांच्यावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
यापुढे तनिषा भिसे प्रकरण घडू नये यासाठी कायदेशीर कारवाई करणार आहे, अशी ग्वाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात मृत्यू अन्वेषण समितीचा चौकशी अहवाल सादर केला आहे. या प्रकरणातील तिन्ही अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आले असून यापुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Vijay Vadettiwar काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबावर केलेली टीका, ही याच प्रवृत्तीचे उदाहरण. वडेट्टीवार म्हणाले की, “गाण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबीयांचे योगदान काय?” आपल्या देशात जेव्हा एखाद्या कुटुंबाने आपले संपूर्ण जीवन राष्ट्रसेवेच्या सुरांमध्ये गुंफले, तेव्हा त्यांच्या नावावर आज प्रश्न उपस्थित करणारी वृत्ती ही उलट्या काळजाचे प्रतीकच मानावी.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गरीबांसाठी असलेला ३० कोटी रुपयांचा निधी वापरलाच नसल्याची धक्कादायक माहिती धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालातून पुढे आली आहे. तसेच गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ रुग्णालय दोषी असल्याचेही या अहवालात स्पष्ट झाले आहे.
गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत सर्वत्र संतापाचे वातावरण असताना आता धर्मादाय रुग्णालयांबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सर्व धर्मादाय रुग्णालयांनी यापुढे 'धर्मादाय' असा उल्लेख असलेला फलक दर्शनी भागात लावावा, असे निर्देश राज्य महिला आयोगाने दिले आहेत.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने वेळेत उपचार न केल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, शिवसेनेकडून भिसे कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली होती. परंतू, भिसे कुटुंबियांनी ती मदत नाकारली असल्याचे सांगण्यात येत आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे. थकीत कर भरण्याबाबत ही नोटीस बजावण्यात आली असून हा कर तात्काळ भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न मिळाल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या महिलेने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. त्यामुळे आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने त्या दोन्ही मुलींचे पालकत्व स्विकारण्याची मागणी करण्यात येत आहे.
( Chief Ministers Relief Fund and Charity Hospital Help Desk ) आरोग्यदायी जीवन ही मनुष्य प्राण्याची गरज. बदलत्या काळानुसार आरोग्यसेवा देणार्या आणि घेणार्या अशा दोन्ही वर्गांच्या प्राथमिकता बदलत आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्याच्या ग्रामीण भागांत वैद्यकीय सेवा आणि तातडीने उपचार देणे, हे आव्हानात्मकच. विशेषकरुन ‘नाही रे’ वर्गाकरिता उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. यासोबतच आर्थिकदृष्ट्या गरजूंना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक साहाय्य मिळावे, य
(Tanisha Bhise Death Case) पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशांमुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आता महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबाची भेट घेतली आहे. भिसे कुटुंबाकडून डॉ. घैसास यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे यांना पाच तास थांबवून ठेवले आणि त्यांना १० लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे या घटनेत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी आहे, अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाल्याने राज्यभरात एकच खळबल उडाली आहे. दरम्यान, या घटनेच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल पुढे आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत या अहवालाती ठळक बाबींवर भाष्य केले.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या गर्भवती महिलेच्या मृत्यूचे राज्यभरात पडसाद उमटले आहेत. दरम्यान, आता या प्रकरणी एक मोठी अपडेट पुढे आली आहे. या रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
(Matoshree Ramabai Ambedkar Maternity Hospital) मुंबईतील चेंबूर पूर्व येथे असणाऱ्या मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसुतीगृहाची तज्ञांच्या समितीमार्फत पाहणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, एक वर्ष उलटूनही अद्याप कोणतीही पाहणी झालेली नाही. यासंदर्भात माजी नगरसेविका आणि सुधारणा समितीच्या सदस्या आशा मराठे यांनी आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पत्र लिहून तातडीने पाहणी करुन अहवाल उच्च न्यायालयाला सादर करण्याची विनंती केली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोर कारभारामुळे एका महिलेने जीव गमावल्याने शिवसैनिकांनी रुग्णालयावर धडक मोर्चा काढला आहे. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत रुग्णालयातील अधिकाऱ्यांवर चिल्लर पैसे फेकत निषेध व्यक्त केला.
(Tanisha Bhise death case) भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे आपला जीव गमवावा लागला. तनिषा यांच्यावर उपचार करण्यासंदर्भात पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाला थेट मंत्रालयातून फोन आला होता. मात्र, तरीही रुग्णालायाने तनिषा यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा आरोप तनिषा यांची नणंद प्रियंका पाटील यांनी केला आहे.
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली दुकान उघडलेल्या डॉक्टरांच्या लालसेमुळेच दोन लेकरे जन्मत:च आईच्या मायेला पोरकी झाली, अशा शब्दात आमदार चित्रा वाघ यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेवर संताप व्यक्त केला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेने जीव गमावला असून राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत.
(Pune Pregnant Woman Case) पुण्यात गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोर कारभारमुळे गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पुणे महानगरपालिकेकडून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेची गंभीर दखल घेतली असून या घटनेच्या चौकशीसाठी धर्मादाय सहआयुक्तांच्या (पुणे) अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेशी संबंधित लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी शुक्रवार, ४ एप्रिल रोजी केली.
आधी १० लाख रुपये भरा मगच रुग्णाला दाखल करून घेऊ, अशा दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, ३ मार्च रोजी घडली.
उन्हाच्या तीव्र झळा सुरू झाल्या आणि बच्चेकंपनीला सुटी लागली की, अनेक पालकांना पर्यटन आणि भ्रमंती खुणावते. नोकरदारवर्गासोबतच तरुणाईलाही भटकंतीचे वेध लागतात. त्यानिमित्ताने गेल्या काही वर्षांतील पर्यटन व्यवसायातील बदलत्या ट्रेंड्सचे आकलन करणारा हा लेख...
अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने प्रकाशित केलेल्या आणि बीएमसीसह डॉक्टर आणि संशोधकांच्या टीमने तयार केलेल्या सविस्तर अहवालानुसार धारावीत दरवर्षी सुमारे ३०० लोक औषधांना प्रतिरोध करणाऱ्या क्षय रोगासाठी पॉझिटिव्ह आढळतात. याच पार्श्वभूमीवर क्षयरोगावर मात करण्याचे मिशन टीबीमुक्त धारावी विषयावर सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांच्याशी दै. मुंबई तरुण भारतने साधलेला संवाद.
TB-Free Dharavi अमेरिकेतील ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शन’ने प्रकाशित केलेल्या आणि मुंबई महानगरपालिकेसह डॉक्टर आणि संशोधकांच्या टीमने तयार केलेल्या एका सविस्तर अहवालानुसार, दरवर्षी सुमारे 300 धारावीकर औषधांना प्रतिरोध करणार्या क्षयरोगासाठी पॉझिटिव्ह आढळतात. या पार्श्वभूमीवर क्षयरोगावर मात करण्याचे ‘मिशन टीबीमुक्त धारावी’ या विषयी सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला हा विशेष संवाद.
( Palghar dependent on Gujarat after 10 years of district formation the work of the district hospital is still incomplete ) जिल्हानिर्मिती होऊन दहा वर्षे लोटली, तरी पालघर अद्याप गुजरातवर अवलंबून असल्याचे वास्तव समोर आले आहे. येथील गोरगरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी नंडोरे या गावात जिल्हा रुग्णालय उभारण्यास मंजुरी देण्यात आली. परंतु, अद्याप 75 टक्केही काम पूर्ण न झाल्याने रुग्णांचे हाल कायम आहेत.
( Health Department take strict action against bogus doctors and hospitals Manisha Kayande & Pravin Darekar ) विधानपरिषदेत आज आमदार मनिषा कायंदे यांनी नाशिकच्या पंड्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या गैरकारभाराबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. या चर्चेत भाग घेत भाजपा गटनेते आ.प्रविण दरेकर यांनी बोगस डॉक्टर, दवाखान्यांवर सार्वजनिक आरोग्य विभाग कठोर कारवाई करणार का, ? असा सवाल उपस्थित केला.
( Glaucoma Week at Thane Civil Hospital ) आरोग्य तपासणी करतेवेळी अनेकजण डोळ्यांच्या तपासणीकडे दुर्लक्ष करत असले तरी याचा विपरीत परिणाम डोळ्यांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डोळ्यांना काचबिंदू झाल्यास प्रथम दर्शनी कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. मात्र दुर्लक्ष झाल्यास कायमच अंधत्व येण्याचा धोका उद्भवतो. याच पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हील रुग्णालयात नुकताच काचबिंदू सप्ताहात नऊ टक्के रुग्णांना काचबिंदूची कमी अधिक लक्षणे दिसून आली आहेत.
मुंबईच्या आर. ए. पोदार महाविद्यालय आणि एम. ए. पोदार रुग्णालयाच्या अधिष्ठातापदावर कार्यरत असलेल्या डॉ. संपदा संत यांच्या विचारकार्याचा घेतलेला मागोवा...
प्रसिद्ध संगीतकार आणि ऑस्कर पुरस्कार विजेते ए. आर. रहमान यांना छातीत दुखू लागल्याने रविवारी सकाळी चेन्नईतील ग्रीम्स रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्यावर ईसीजी, इकोकार्डियोग्राम तसेच इतर काही आवश्यक चाचण्या करण्यात आल्या आहेत. आज त्यांच्या अँजिओग्राम तपासणीची शक्यता असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, अंधत्वाचे प्रमुख कारण ठरणार्या आजारांपैकी एक म्हणजे काचबिंदू (Glaucoma). हा एक डोळ्यांचा गंभीर आजार असून वेळीच निदान आणि उपचार न केल्यास कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकते. याच आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘जागतिक काचबिंदू सप्ताह’ दरवर्षी मार्च महिन्यात साजरा केला जातो. आज दि. १२ मार्च हा दिवस ‘जागतिक काचबिंदू दिन’ म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने नेत्ररोगतज्ञ, ‘अनिल आय हॉस्पिटल्स ग्रुप’च्या मेडिकल डायरेक्टर, डॉ. अनघा हेरूर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्
काचबिंदू म्हणजे काय? काचबिंदू झाल्यानंतर डोळ्यांवरील उपचार पद्धती काय असते? डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काय उपाय करावेत? जागतिक काचबिंदू सप्ताहानिमित्त (World Glaucoma Week) प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ अनिल आय हॉस्पिटल्स ग्रुप मेडिकलच्या डायरेक्टर, डॉ. अनघा हेरूर यांची विशेष मुलाखत