डोंबिवली : (Dombivli Hawkers Protest) शहर पथ विक्रेता अधिनियमाला केराची टोपली दाखवून पालिकेकडून सुरू असलेल्या अन्यायकारक कारवाईविरोधात डोंबिवलीतील फेरीवाले आता थेट संघर्ष करणार आहेत. येत्या १५ ऑगस्ट रोजी, स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून फेरीवाल्यांचा डोंबिवली पालिका कार्यालयावर तीव्र धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे आणि समिती सदस्य भालचंद्र (भाऊ) पाटील यांनी दिला आहे. नियमबाह्य कारवाई थांबवून पुनर्वसन न केल्यास हा एल्गार पुकारला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.(Dombivli Hawkers Protest)
फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे आणि भाऊ पाटील यांनी पालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर यांची बुधवारी भेट घेऊन चर्चा केली.(Dombivli Hawkers Protest)
डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी सध्या पालिका प्रशासनाकडून कडक मोहीम आणि कारवाई सुरू आहे. मात्र, ही कारवाई करताना 'शहर पथ विक्रेता अधिनियम २०१४' मधील नियमांना केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप भाऊ पाटील यांनी सहाय्यक आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान केला. फेरीवाल्यांवर सुरू असलेली ही कारवाई अत्यंत अन्यायकारक आहे.(Dombivli Hawkers Protest)
जर प्रशासनाने ही अन्यायकारक कारवाई तात्काळ थांबवली नाही आणि फेरीवाल्यांचे योग्य पुनर्वसन केले नाही, तर १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून डोंबिवलीतील पालिका कार्यालयावर तीव्र धडक मोर्चा काढण्यात येईल, असे फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी सांगितले.(Dombivli Hawkers Protest)