जिहादींची मुंडकी छाटून टाका! मतांची भीक नको!

नगरमधील हत्येनंतर भाजप आमदार अक्षय कर्डिले कडाडले लांडगे, जगतापांनंतर कर्डिलेही हिंदुत्वासाठी आक्रमक

    13-Aug-2026
Akshay Kardile
 
 
अहिल्यानगर,(Akshay Kardile): अहिल्यानगरमध्ये धीरज परदेशी या हिंदुत्ववादी तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या विराट मोर्चात राहुरीचे भाजप आमदार अक्षय कर्डिले यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे नगरसह महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. "जिहादी आरोपींना गजाआड करण्याऐवजी त्यांची मुंडकी छाटली पाहिजेत”, असे संतप्त उद्गार कर्डिले यांनी काढले. “आम्हाला तुमच्या मतांची भीक नको आणि तुम्हीही आमच्याकडे काम घेऊन येऊ नका,” असेही त्यांनी मुस्लीम कट्टरपंथियांना खडसावले.(Akshay Kardile)
 
कपाळावर भगवा टिळा लावतो, या कारणावरून दर्गा दायरा कब्रस्तानात जिहादी टोळक्याने धीरज परदेशी या हिंदू तरुणाची हत्या केली. या हत्येच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी अहिल्यानगर बंदची हाक दिली. तसेच जिहादी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी विराट मोर्चा काढला. त्या मोर्चासमोर भाषण करताना आमदार अक्षय कर्डिले यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला.(Akshay Kardile)
 
“आरोपींना अटक करता येत नसेल तर आम्हाला सांगा. इथे बसलेले मुकुंदनगरमध्ये घुसले तर एकही जिवंत राहणार नाही,” असा इशारा देतानाच, "आरोपींना गजाआड करण्याऐवजी त्यांची मुंडकी छाटली पाहिजेत," असे फर्मान त्यांनी काढले. यावेळी त्यांनी मतांच्या राजकारणावरही भाष्य केले. “तुमची मतं तुम्हालाच राहू द्या. आम्हाला तुमच्या मतांची भीक नको आणि तुम्हीही आमच्याकडे कामे घेऊन येऊ नका,” असे त्यांनी कट्टरवाद्यांना सुनावले.(Akshay Kardile)
 
जगतापांनंतर कर्डिलेही आक्रमक हिंदुत्वाच्या वाटेवर?
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या पाठोपाठ आता भाजप आमदार अक्षय कर्डिले यांनीही आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. दिवाळीत केवळ हिंदूंकडूनच वस्तू खरेदी करण्याचे आवाहन जगताप यांनी केले होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी त्यावेळी नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत कर्डिले यांनीही आक्रमक हिंदुत्वाचा नारा बुलंद केला आहे. नितेश राणे, महेश लांडगे यांच्यापाठोपाठ आता अक्षय कर्डिले देखील प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेमुळे महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत आहेत.(Akshay Kardile)
 
गुहा धार्मिक स्थळ वादातही सहभाग
 
मार्च २०२६ मध्ये राहुरी तालुक्यातील गुहा येथील धार्मिक स्थळाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर कानिफनाथ महाराज यात्रोत्सवात अक्षय कर्डिले सहभागी झाले होते. औरंगाबाद खंडपीठाने वक्फ न्यायाधिकरणाचा मनाई आदेश हटवल्यानंतर झालेल्या यात्रेत कर्डिले आणि राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांनी एकत्र महाआरती केली होती. या धार्मिक स्थळाचा वादही त्यावेळी राजकीयदृष्ट्या गाजला होता.(Akshay Kardile)
 
अक्षय कर्डिलेंचा राजकीय प्रवास
 
अक्षय कर्डिले हे दिवंगत भाजप नेते आणि माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र आहेत. भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. ते युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहिले. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजकारणात त्यांचा प्रवेश झाला. वडील शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर मे २०२६ मध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. त्यावेळी तब्बल १ लाख १२ हजार ५८७ मतांच्या विक्रमी फरकाने ते विजयी झाले.(Akshay Kardile)
 
पीडित कुटुंबासाठी संग्राम जगतापही मैदानात
 
दरम्यान, अहिल्यानगरमधील धीरज परदेशी हत्येप्रकरणी पीडित कुटुंबाची बाजू मांडण्यासाठी आमदार संग्राम जगताप देखील मैदानात उतरले आहेत. या हत्येची सखोल चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी आ. जगताप शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत.(Akshay Kardile)
 
“आरोपींना अटक करता येत नसेल तर आम्हाला सांगा. इथे बसलेले मुकुंदनगरमध्ये घुसले तर एकही जिवंत राहणार नाही. आरोपींना गजाआड करण्याऐवजी त्यांची मुंडकी छाटली पाहिजेत. तुमची मतं तुम्हालाच राहू द्या. आम्हाला तुमच्या मतांची भीक नको आणि तुम्हीही आमच्याकडे कामे घेऊन येऊ नका”(Akshay Kardile)
- अक्षय कर्डिले, आमदार, भाजप  
 
 




संबंधित मजकूर