सिंधुदुर्गला परप्रांतीय भूमाफियांचा विळखा; जयंत पाटील यांचे महसूलमंत्र्यांना पत्र

    12-Aug-2026   

Sindhudurg Land Mafia
 
मुंबई (Sindhudurg Land Mafia) : पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेला सिंधुदुर्ग परप्रांतीय भूमाफियांचा विळख्यात सापडला आहे. स्थानिकांच्या जमिनी हडप करण्यापासून हजारो वृक्षांची सर्रास कत्तल करण्यापर्यंतचे गंभीर प्रकार घडत आहेत. सरकारने या सर्व प्रकरणांची तातडीने चौकशी सिंधुदुर्गची जमीन भूमाफियांपासून वाचवावी आणि स्थानिकांना न्याय द्यावा, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आ. जयंत पाटील यांनी महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिले आहे. (Sindhudurg Land Mafia)

जयंत पाटील या पत्रात म्हणाले की, "नुकत्याच संपन्न झालेल्या पावसाळी अधिवेशनात मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील सासोली गावातील जमिन गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला होता. तत्कालीन तहसीलदारांनी बनावट कागदपत्रे तसेच सहहिस्सेदारांची परवानगी न घेता अकृषक व विकासाची परवानगी परप्रांतियांना दिल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आणला होता. त्यावर महसूल मंत्र्यांनी या सर्व प्रकाराची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन सभागृहास दिले होते. परंतू, या परप्रांतीय भूमाफियांची हिंमत एवढी वाढली आहे की, ते आता शासनालादेखील घाबरत नाहीत. याच जमिनीवरील ६ हजारांहून अधिक वृक्षांची विनापरवाना कत्तल करण्यात येत असून डोंगराचे सपाटीकरण हे भूमाफिया करीत आहे. सर्वेश पेडणेकर या तरुणाने निडरपणे हे वास्तव समोर आणले आहे. असाच प्रकार याच भागातील घारपी उडेली गावात घडत असून तिथे नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बांध घालून अडवण्याचा प्रकार परप्रांतीयांकडून चालू असून बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन करून विक्री करण्यात येत आहे." (Sindhudurg Land Mafia)

"सरकारने या सर्व प्रकरणांची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि सिंधुदुर्गची जमीन, नैसर्गिक जैवसंपदा, भूमाफियांपासून वाचवावी व स्थानिकांना न्याय द्यावा," अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. (Sindhudurg Land Mafia)





अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर