जरांगे पुन्हा मुंबईत धडकणार?

    12-Aug-2026
Manoj Jarange Mumbai Protest
 
मुंबई : (Manoj Jarange) राज्यातील मराठा बांधव मुंबईकडे कूच करू शकतात, असे वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले असून पुन्हा एकदा मुंबईत मराठे धडकणार का? अशी चर्चा रंगली आहे.
 
मराठा समाजाला दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात येत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. यावरून सध्या राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातच आता जरांगे यांच्या वक्तव्याने पुन्हा मराठ्यांचे आंदोलन होणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.(Manoj Jarange)
 
मनोज जरांगे म्हणाले की, "मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार आहे. सुरत मार्गे, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, बडोदा, गुजरात, तसेच समुद्र मार्गे गोव्याकडूनही विविध भागांतून मराठे येणार आहेत. एखाद्या वेळी कदाचित मुंबईतच आंदोलन होण्याची शक्यता आहे. मराठा समाजात याबाबतच चर्चा सुरू आहे. एखाद्या वेळी मराठे मुंबईलाच जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. पुन्हा मुंबईतच आंदोलन करण्याचा निर्णय होऊ शकतो."(Manoj Jarange)
 
'ती' डिफेंडर कुणाची?
 
मनोज जरांगे यांचा पश्चिम महाराष्ट्रात दौरा सुरू असून यावेळी ते एका डिफेंडर गाडीतून प्रवास करताना दिसले. दरम्यान, ही महागडी गाडी कुणाची आहे, ती कुठून आली, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. (Manoj Jarange)
 
त्यानंतर जरांगे यांनी यावर स्पष्टीकरण दिले. ही गाडी आपल्याला आपल्या एका कार्यकर्त्याने वापरायला दिल्याचे त्यांनी सांगितले. डिफेंडर ही आलिशान गाडी सांगोला तालुक्यातील सुभाष भोसले यांनी जरांगे यांना वापरायला दिली आहे. या गाडीत पहिल्यांदा मनोज जरांगे यांनी बसावे ही आपली इच्छा असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.(Manoj Jarange)
 
 




संबंधित मजकूर