महाराष्ट्राची एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वेगवान झेप! जीसीसीच्या माध्यमातून ४ लाख उच्च-कौशल्याधारित रोजगार आणि ५० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे लक्ष्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



Maharastrs GCC Event

पुणे ( Maharastrs GCC Leadership Summit) : महाराष्ट्राला जागतिक क्षमता केंद्रांसाठी (जीसीसी) भारतातील आघाडीचे आणि सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनविण्याचा राज्य सरकारचा निर्धार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पुण्यात आयोजित ‘जीसीसीप्रोस लीडरशिप समिट'मध्ये बोलताना त्यांनी राज्यात ४०० नवीन जीसीसी केंद्रे, चार लाख उच्च कौशल्याधारित रोजगार आणि ५० हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य जाहीर केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, भारतातील जीसीसी क्षेत्राची सुरुवात प्रामुख्याने कुशल मनुष्यबळ आणि खर्चाच्या दृष्टीने कार्यक्षमतेच्या आधारे झाली. मात्र, आता या केंद्रांचे स्वरूप वेगाने बदलत आहे. भविष्यात जीसीसी केवळ कार्यालयीन सहाय्यापुरते मर्यादित न राहता कृत्रिम बुद्धिमत्ता, अभियांत्रिकी, सायबर सुरक्षा, वित्तीय सेवा, माहिती विश्लेषण, उत्पादन विकास आणि संशोधन-विकासाचे प्रमुख केंद्र बनतील. ( Maharastrs GCC Leadership Summit)

महाराष्ट्रातील इतर शहराच्या विकासावरही भर

महाराष्ट्राकडे जीसीसी विकसित करण्यासाठी आवश्यक असलेली व्यापक परिसंस्था उपलब्ध असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. मुंबईची वित्तीय व व्यावसायिक ताकद, पुण्याची अभियांत्रिकी, वाहन उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील क्षमता याशिवाय नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही विशेषीकृत जीसीसी विकसित करण्याची क्षमता आहे.( Maharastrs GCC Leadership Summit)

२०२५ मध्ये पुणे भारतातील जीसीसी कार्यालयीन बाजारपेठेतील प्रमुख शहर ठरले असून, जीसीसीसाठी कार्यालयीन जागेच्या मागणीत मागील वर्षाच्या तुलनेत मोठी वाढ झाली. २०२६ च्या अखेरीस पुणे जीसीसी क्षेत्रात देशाचे नेतृत्व करेल, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ( Maharastrs GCC Leadership Summit)



केवळ अनुदान नव्हे, सक्षम परिसंस्थेवरही भर

जीसीसी आकर्षित करण्यासाठी केवळ आर्थिक सवलती देणे पुरेसे नसून, दीर्घकालीन आणि सक्षम परिसंस्था निर्माण करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यासाठी प्रतिभावान मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, संशोधन, विद्यापीठे, व्यवसाय सुलभता आणि उत्तम जीवनमान यावर भर दिला जाणार आहे. ( Maharastrs GCC Leadership Summit)

राज्याच्या जीसीसी धोरणात वेतन, भांडवली खर्च, भाड्यासाठी सहाय्य, व्याज आणि संशोधन-विकासासाठी विविध प्रोत्साहनांचा समावेश आहे. तसेच अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (FSI), जमिनीची उपलब्धता, डिजिटल पायाभूत सुविधा आणि २४ तास ७ दिवस कार्यपद्धतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यावरही भर दिला जात आहे. मात्र, हे सर्व साधन सुविधा असून, राज्याचे मुख्य उद्दिष्ट क्षमता निर्माण करणे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ( Maharastrs GCC Leadership Summit)


'कृत्रिम बुद्धिमत्ता' AI आणि भविष्यातील कौशल्यांवर लक्ष

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे रोजगाराचे स्वरूप बदलत असल्याने भविष्यातील कौशल्यांची निर्मिती करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता अभियंते, माहिती विश्लेषण तज्ज्ञ, सायबर सुरक्षा तज्ज्ञ, अर्धवाहक तंत्रज्ञान (सेमीकंडक्टर) अभियंते, प्रगत उत्पादन तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि परिमाणात्मक वित्तीय क्षेत्रातील तज्ज्ञांची मागणी वाढणार आहे. ( Maharastrs GCC Leadership Summit)

सरकार, उद्योग आणि शिक्षण क्षेत्राने एकत्रितपणे भविष्यातील कौशल्यांवर काम करावे. पुढील पाच वर्षांत कोणत्या कौशल्यांची गरज भासणार आहे, याबाबत उद्योगांनी विद्यापीठांना मार्गदर्शन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ( Maharastrs GCC Leadership Summit)

कृत्रिम बुद्धिमत्तेत महाराष्ट्र आघाडीवर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महाराष्ट्राला देशातील आघाडीचे राज्य बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. यावर्षी दावोस येथे बीकेसी मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, संशोधन आणि नवोन्मेष यावर केंद्रित केंद्र स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. भविष्यातील तंत्रज्ञानाच्या निर्मितीत महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. ( Maharastrs GCC Leadership Summit)
 
अर्धवाहक तंत्रज्ञान, वित्तीय तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, प्रगत अभियांत्रिकी, औषधनिर्माण क्षेत्रातील संशोधन व विकास, विद्युत वाहन तंत्रज्ञान आणि औद्योगिक तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राकडे आधीपासूनच मजबूत औद्योगिक क्षमता आहे. या क्षमतांचा संगम साधून जागतिक क्षमता केंद्रांची पुढील पिढी महाराष्ट्रात विकसित झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
( Maharastrs GCC Leadership Summit)


 
मुंबई-पुण्याबरोबरच अन्य शहरांमध्येही जीसीसीचा विस्तार
 
राज्यातील सर्व ४०० जागतिक क्षमता केंद्रे (जिसीसी) केवळ मुंबई आणि पुण्यापुरती मर्यादित न राहता द्वितीय आणि तृतीय स्तरातील शहरांमध्येही विकसित झाली पाहिजेत, असे फडणवीस यांनी सांगितले. ( Maharastrs GCC Leadership Summit)
 
मुंबईला जागतिक वित्तीय आणि संस्थात्मक कार्यांचे केंद्र, पुण्याला अभियांत्रिकी व उत्पादन विकासाचे केंद्र, नवी मुंबईला जागतिक व्यवसाय व तंत्रज्ञान केंद्र, नागपूरला विशेषीकृत तंत्रज्ञान व सामायिक सेवा केंद्र, नाशिकला अभियांत्रिकी व औद्योगिक क्षमतांचे केंद्र, तर छत्रपती संभाजीनगरला प्रगत उत्पादन आणि वाहन उद्योगातील क्षमतांचे केंद्र म्हणून विकसित करता येईल. ( Maharastrs GCC Leadership Summit)
 
शासनाच्या कार्यपद्धतीतही बदल
 
जीसीसी क्षेत्राच्या वाढीसाठी शासनाची कार्यपद्धती अधिक गतिमान करण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे. उद्योगांना मंजुरीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी एक जबाबदार व्यक्ती आणि एक समन्वित प्रणाली निर्माण करण्यावर सरकारचा भर आहे. (Maharastrs GCC Leadership Summit)
 
महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टात जीसीसी क्षेत्राची भूमिका महत्त्वाची असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. जीसीसीच्या माध्यमातून केवळ गुंतवणूकच नव्हे, तर ज्ञान, संशोधन, जागतिक कार्यपद्धती आणि उच्च मूल्याधारित रोजगार महाराष्ट्रात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ( Maharastrs GCC Leadership Summit)
 
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, जीसीसी प्रोसचे मुख्य कार्यकारी अधिकारी शम्मी प्रभाकर सिंह, सहसंस्थापक व समन्वयक नीलेश देशमुख यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. ( Maharastrs GCC Leadership Summit) 





मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर