१५ ऑगस्टपासून महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी बंधनकारक! नियम न पाळल्यास लायसन्स रद्द...

    12-Aug-2026

मुंबई: (Auto Taxi Rules) महाराष्ट्रात व्यावसायिक रिक्षा, टॅक्सी तसेच ॲप-आधारित कॅब चालकांसाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा आणि कठोर निर्णय घेतला आहे. 'महाराष्ट्र मोटार वाहन (सुधारणा) नियम, २०२६' अंतर्गत सर्व व्यावसायिक चालक आणि परमिटधारकांना 'व्यावहारिक मराठी'चे ज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास किंवा मराठी भाषा येत नसल्यास चालकाचा परवाना ३ महिन्यांसाठी निलंबित अथवा कायमचा रद्द करण्याची थेट तरतूद करण्यात आली आहे. (Auto Taxi Rules)

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ मधील संदिग्धता दूर करून त्यात कायदेशीर सुधारणा करण्यात आल्या आहेत. (Auto Taxi Rules)

रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी ४ महत्त्वाचे नियम

नियम ४ च्या उपनियम (४) मध्ये बदल करून अधिकृततेसाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषेचे कार्यकारी अर्थात व्यावहारिक ज्ञान असणे बंधनकारक केले आहे. (Auto Taxi Rules)

नव्या नियम २२ (३ए) नुसार ॲप-आधारित कॅब चालकांना मराठी येत नसल्यास, परवाना प्राधिकरणाकडून संबंधित चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स जास्तीत जास्त ३ महिन्यांसाठी निलंबित केले जाईल. (Auto Taxi Rules)

तरीही सातत्याने नियमांचे उल्लंघन केल्यास परवाना कायमचा रद्द केला जाईल. (Auto Taxi Rules)

ही अट केवळ चालकांपुरती मर्यादित नसून परमिटधारक आणि परमिटचे नूतनीकरण करतानाही संबंधित व्यक्तीला व्यावहारिक मराठीचे ज्ञान असणे आवश्यक राहील. (Auto Taxi Rules)

यापूर्वी मराठीचे ज्ञान अनिवार्य असूनही अनेक अमराठी रिक्षा-टॅक्सी चालक या नियमाकडे दुर्लक्ष करत होते. मराठी भाषेवरून प्रवासी आणि चालकांमध्ये सातत्याने वादाचे प्रसंग घडत होते. पूर्वीच्या नियमांतील त्रुटींचा गैरफायदा घेतला जात असल्याने परिवहन मंत्र्यांच्या सूचनेनुसार कायदेशीर सुधारणा करून 'महाराष्ट्र मोटार वाहन (सुधारणा) नियम, २०२६' लागू करण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांशी सुलभ संवाद, सुरक्षा आणि स्थानिक भाषेचा आदर सुनिश्चित होणार आहे. (Auto Taxi Rules)






संबंधित मजकूर