मुंबई : (Dahihandi Holiday) मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी २०२६ मधील स्थानिक सुट्टीमध्ये बदल करण्यात आला आहे. गोपाळकाला (दहीहंडी) ऐवजी आता रक्षाबंधनाच्या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सोमवारी, सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे शुद्धीपत्रक जारी केले. (Dahihandi Holiday)
यानुसार, यापूर्वी दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी गोपाळकाला (दहीहंडी) निमित्त जाहीर करण्यात आलेली स्थानिक सुट्टी रद्द करून त्याऐवजी दि. २८ ऑगस्ट २०२६, शुक्रवार रोजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Dahihandi Holiday)
ही स्थानिक सुट्टी केवळ मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय व निमशासकीय कार्यालयांना लागू राहणार आहे. शासनाच्या १९५८ मधील संबंधित तरतुदींनुसार ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. (Dahihandi Holiday)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....