मुंबई : (Cities Economic Progressive Growth Engines) "शहरे म्हणजे केवळ विटा आणि काँक्रीटच्या इमारती नाहीत, तर देशाच्या आर्थिक प्रगतीची ग्रोथ इंजिन आहेत. त्यामुळे शहरीकरणाकडे समस्या म्हणून नव्हे, तर मोठी संधी म्हणून पाहिले पाहिजे.ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्कलेव्ह २०२६ ची सुरुवात मुंबईत झाली ही अभिमानाची गोष्ट आहे. या परिषदेसाठी मुंबईची निवड केल्याबद्दल मुंबई फर्स्टचे विशेष आभार." असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
'मुंबई फर्स्ट' आयोजित 'ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉनक्लेव्ह - २०२६' चे आयोजन मंगळवार दि.११ रोजी करण्यात आले होते. यावेळी त्यांनी सहभागी होऊन मनोगत मांडले.(Cities Economic Progressive Growth Engines)
याप्रसंगी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, ब्रिक्स मुंबई फर्स्टचे अध्यक्ष नरेंद्र नायर, मुंबई फर्स्ट उपाध्यक्ष प्रशांत देसाई, सह-सचिव एस राममूर्ती, ब्रिक्सचे सदस्य असलेल्या देशांचे प्रतिनिधी, विविध शहरांचे महापौर, नगररचनाकार, धोरणकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.(Cities Economic Progressive Growth Engines)
"शहरविकासाचे कोणतेही धोरण आखताना लवचिकता, नाविन्यपूर्णता, सहकार्य आणि शाश्वतता यांच्या माध्यमातून २१व्या शतकातील नागरिक केंद्रित शहरे उभारण्यासाठी ब्रिक्स देशांतील शहरांनी आपले अनुभव, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांची एकमेकांशी देवाणघेवाण करावी.आजच्या काळात शहरांसमोरील आव्हाने समान असल्याने त्यांचे समाधानही सीमांच्या पलीकडे जाऊन शोधावे लागेल."अशी अपेक्षा यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.(Cities Economic Progressive Growth Engines)