आता राहुल गांधींनी कानाचे पडदे बंद केलेत का? - मंत्री आशिष शेलार; सीजेपीची भूमिका सिलेक्टिव

    11-Aug-2026   

Ashish Shelar Rahul Gandhi Ranchi Student Movement
 
मुंबई : (Ashish Shelar Rahul Gandhi Ranchi Student Movement) इंडिया आघाडीच रांचीमधील मुलांवर हमला करणारे हल्लेखोर आहेत. काँग्रेस आणि विरोधी पक्ष हे हल्लेखोर असल्यामुळे त्यांना आता तोंड दाखवायला जागा नाही. काँग्रेस आणि राहुल गांधी यांची भूमिका दुटप्पी आहे. छात्रो की गुंज म्हणणाऱ्या राहुल गांधींना रांची की, गुंज ऐकू येत नाही. त्यांनी आता कानाचे पडदे बंद केलेत का? असा सवाल सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केला.
 
मंगळवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "संसदीय सत्र सुरु असून विरोधकांनी गोंधळ करण्यापलीकडे या सत्रामध्ये जनहितार्थ काहीही केलेले नाही. देशाचे गृहमंत्री अमित शाह हे संसदेत उपस्थित राहणार असून, चर्चा आणि निवेदनही करणार आहे. पण राहुल गांधींनी पळ काढू नये. संसद भवन ही लोकांचे प्रश्न सोडवण्याची जागा आहे. तिथे गोंधळ माजवणे, खोटे पसरवणे हे तुम्ही केलेच, पण आता सत्य ऐकण्याची तयारी ठेवा आणि चर्चेत सहभागी व्हा. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उत्तराला सामोरे जाण्याची हिंमत ठेवा, पळपुटेपणा करू नका."(Ashish Shelar Rahul Gandhi Ranchi Student Movement)
 
राहुल गांधी कुणाचा राजीनामा घेणार?
 
"काल रांची येथे आमचे विद्यार्थी, तरुण वर्ग शांततेने आणि संयमितपणे नोकर भरतीच्या परीक्षेमध्ये पारदर्शकता असावी यासाठी आंदोलन करत होते. जेपीएससीच्या नोकर भरती परीक्षेमध्ये पारदर्शकता हवी म्हणून आंदोलन करणाऱ्या मुलांवर तिथल्या सरकारने अतिशय अमानुषपणे हल्ला केला. तारेचे कुंपण, अश्रुधूर, बळाचा वापर, लाठीचार्ज, भगिनींवर हात उचलणे, पोलिसांनी आंदोलकांना बदडवणे हे अतिशय अमानुष आणि संतापजनक आहे. झारखंडमध्ये काँग्रेस-जेएमएमचे सरकार आहे. १६ आमदार आणि ४ मंत्री घेऊन राहुल गांधी त्या सरकारचे नेतृत्व करत आहे. अशावेळी या आंदोलनात बळाचा वापर का केला? आता आम्ही पोलिसांनी बळाचा वापर करण्याचे आणि महिलांवर हमला करण्याचे आदेश कोणी दिले होते हा प्रश्न विचारायचा का? आता राहुल गांधी कुणाचा राजीनामा घेणार आहेत की, देणार आहेत? रांचीमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांनी कुठलाही अपमानास्पद, अश्लील किंवा आपत्तीजनक भाषेचा उपयोग केलेला नाही. ते आपल्या मागण्यांवर बोलत आहे. तरीसुद्धा त्या विद्यार्थांवर अश्रृधुराचा वापर केल्याबद्दल सोरेन आणि राहुल गांधी देशासमोर काय भूमिका मांडणार आहेत?" असा सवालही त्यांनी केला.(Ashish Shelar Rahul Gandhi Ranchi Student Movement)
 
मातोश्री आणि शिवतीर्थचे दरवाजे बंद का?
 
ते पुढे म्हणाले की, "भारतीय जनता पार्टी या विद्यार्थ्यांच्या मागणीच्या समर्थनार्थ असून त्यांच्या मागे उभी आहे. या आंदोलनात संयमी भूमिका घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आमचे समर्थन आहे. तसेच सरकारमधील ज्या लोकांनी संयम सोडला त्याबद्दल राहुल गांधी आणि हेमंत सोरेन यांनी स्पष्टता द्यावी. इंडिया आघाडीच रांचीमधील मुलांवर हमला करणारे हल्लेखोर आहेत. तसेच इकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीही बोबडी बंद का आहे? विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होत असताना मातोश्री आणि शिवतीर्थचे दरवाजे बंद का आहेत? उद्धव ठाकरेंना आम्ही रांचीचे तिकीट काढून देऊ. ठाकरे आता रांचीला का जात नाहीत? विरोधी पक्षांनी कधीही विद्यार्थ्यांचे हित बघितले नाही. राजकीय सोयीची भूमिका हेच त्यांचे धोरण असून त्यांचे हे नौटंकी आंदोलन संसदेत सुरु आहे. विद्यार्थ्यांचे त्यांचे प्रेम पुतना मावशीचे असल्याचे सिद्ध झाले आहे."(Ashish Shelar Rahul Gandhi Ranchi Student Movement)
 
सीजेपीची कार्यपद्धती सिलेक्टिव
 
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "सीजेपीची भूमिका समर्थनाची असेल तर त्याला वराती मागून घोडे असेच म्हणावे लागेल. त्यांनी तब्येत बरी नाही, आताच आम्हाला बाहेर पडता येणार नाही, आमची संघटनेची बैठक आहे, अशी कारणे दिलीत. सीजेपीला १७ दिवस रांचीच्या विद्यार्थ्यांचे हित दिसले नाही का? सीजेपीचा बोलवता धनी किंवा मालक त्यांना फर्मान देत नाही, असे आम्ही समजायचे का? मालकाने फर्मान दिल्यावरच सीजेपीची मंडळी आपल्या जागेवरून हलणार. सीजेपीची कार्यपद्धती सर्वसमावेशक नसून सिलेक्टिव आहे.
 
ते आता उघडले पडले आहेत. रांचीच्या आंदोलनाकडे पाठ आणि जंतरमंतरच्या आंदोलनाकडे तोंड या दोनच भूमिका विरोधकांचा दुटप्पीपणा स्पष्ट करणाऱ्या आहेत. विद्यार्थी हित, तरुणांचे भविष्य, परीक्षेतील पारदर्शकता आणि रोजगार या विषयाला धरून जर आंदोलनाला समर्थन देणाऱ्या संघटना आज रांचीला पाठ का दाखवतात? या दुटप्पीपणामुळे विरोधी पक्ष तोंडावर पडतील."(Ashish Shelar Rahul Gandhi Ranchi Student Movement)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर