मॉस्को: (Russia-Ukraine war) गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया- युक्रेन युद्धाने पुन्हा तोंड वर काढले आहे. सोमवार दि. १० ऑगस्ट रोजी युक्रेनने रशियावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात रशियातील निइनेकाम्स्क शहरातील एका लहान बालकासह एकूण १३ जणांचा मृत्यू झाला असून, ४८ जण जखमी असल्याची माहिती माध्यमांवरून मिळत आहे. (Russia-Ukraine war)
तेलशुद्धकरणाचे केंद्र असलेले रशियातील निइनेकाम्स्क या शहरात दोन तेलशुद्धीकरण प्रकल्प आणि एक पेट्रोकेमिकल प्रकल्प आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून युक्रेनकडून सातत्याने सुरू असलेल्या लांब पल्ल्याच्या ड्रोन हल्ल्यांमुळे रशियन जनतेत मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. युक्रेन मोठ्याप्रमाणात तेलसंबंधित सुविधांवर जवळपास रोज हल्ले करत असल्याने रशियामध्ये इंधनटंचाई निर्माण झाली आहे. त्यासोबतच, तेलशुद्धीकरण क्षमता देखील कमी झाली आहे. (Russia-Ukraine war)
दरम्यान आता माध्यमांवरून असे देखील म्हटले जात आहे कि, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ही मोहिम रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमार पुतिन यांना चर्चेच्या टेबलवर येण्यास भाग पाडण्यासाठी आणि गेल्या चार वर्षांहून अधिक काळ सुरू असलेले रशिया- युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी असल्याचे सांगितले जात आहे. (Russia-Ukraine war)
युक्रेनच्या सीमेपासून सुमारे १,२०० किलोमीटर पूर्वेला असलेल्या निइनेकाम्स्क शहराची लोकसंख्या सुमारे २ लाख ४० हजार इतकी आहे. दरम्यान युक्रेने विकसित केलेल्या ड्रोन हल्ल्यांची क्षमता इतकी आहे की ते आता रशियाच्या आणखी आतपर्यंत पोहोचले आहेत आणि काही ड्रोन तर सीमेपासून २,००० किलोमीटर दूर असलेल्या सैबेरियापर्यंत दखील पोहोचत आहेत. असे माध्यमांवरून समजत आहे. (Russia-Ukraine war)
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रविवारी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “आम्ही पूर्णपणे न्याय्य प्रत्युत्तर देत आहोत आणि रशियाच्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जाईल. रशियाने सुरू केलेल्या युद्धाची झळ आता रशियातील नागरिकांनाही अधिकाधिक जाणवेल.” (Russia-Ukraine war)
“हे युद्ध अजूनही सुरू राहण्याचे एकमेव कारण म्हणजे रशियाची ते संपवण्याची इच्छा अद्याप दिसत नाही,” असेही झेलेन्स्की यांनी नमूद केले. (Russia-Ukraine war)
दरम्यान, रशियाकडून क्षेपणास्त्रे, शक्तिशाली ग्लाइड बॉम्ब आणि ड्रोनच्या माध्यमातून युक्रेनवर नियमितपणे हवाई हल्ले सुरू आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यांमध्ये नागरी भागांनाही लक्ष्य करण्यात आले असून, युद्धात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. (Russia-Ukraine war)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.