मुंबई,(Karjat road potholes) : रस्त्यावरील खड्डे आणि दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांकडून अनेकदा तक्रारी केल्या जातात. मात्र, रायगडच्या कर्जत तालुक्यात दोन शाळकरी मुलींनी चक्क पत्रकारांच्या शैलीत केलेले ‘स्पेशल रिपोर्टिंग’ने सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. कोंदिवडे येथील रस्त्याची दुरवस्था दाखवणारा नेहा आणि ज्योत्सना या दोन शाळकरी मुलींनी मजामस्ती म्हणून केलेल्या व्हिडीओमुळे चक्क प्रशासनाने तात्काळ रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले.(Karjat road potholes)
दरम्यान, शाळेत जाताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधण्यासाठी या दोघींनी पत्रकारांच्या धाटणीमध्ये व्हिडिओ तयार केला. व्हिडिओमध्ये त्यांनी रस्त्याची अवस्था, खड्डे आणि नागरिकांना होणारा त्रास विनोदी मात्र प्रभावी पद्धतीने मांडला. त्यांच्या रिपोर्टिंगची शैली आणि संवादामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाला.(Karjat road potholes)
या व्हिडिओतील ‘द्रुतगती महामार्गावरून जाताना पोटातलं पाणीही हलत नाही’ ही ओळ विशेष चर्चेत आली. यामागची गंमतही या मुलींनी माध्यमांशी बोलताना सांगितली. व्हिडिओ तयार करण्याच्या दिवशीच शाळेतील सरांनी त्यांना द्रुतगती महामार्गाबाबत माहिती दिली होती. द्रुतगती महामार्गावरून प्रवास करताना रस्त्याच्या चांगल्या गुणवत्तेमुळे ‘पोटातलं पाणीही हलत नाही’, असं सरांनी सांगितले होते. त्याच वाक्याचा संदर्भ घेत आपण व्हिडिओमध्ये ही ओळ वापरल्याचं मुलींनी सांगितले. तसेच, आपण बातम्या पाहतो त्यामुळे पत्रकारांच्या शैलीतील रिपोर्टिंगची कल्पना त्यांना सुचल्याचेही या दोघींनी सांगितले.(Karjat road potholes)
व्हायरल व्हिडिओची चर्चा; भर पावसात रस्त्याचे काम सुरु
मुलींचा हा व्हिडिओ सोशल मीडियासह प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनीही या प्रकरणाची दखल घेतली. थोरवे यांनी नमूद केले की, खांडपे - कोंदिवडे रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. या संदर्भातील माहिती मिळताच तत्काळ संबंधित विभागाशी संपर्क साधून रस्ता दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने आज या रस्त्यातील खड्डे बुजवत रस्ता दुरुस्त करून वाहतूक सुरुळीत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी ही काम वेगात व लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांच्या समस्या जाणून त्या तत्काळ सोडवणे ही आजही जबाबदारी आहे, माझ्या मतदारसंघातील नागरिकांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत व सुखकर होण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे., असेही त्यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी रस्त्याचे काम सुरु असल्याचेही फोटोही समाजमाध्यमात शेअर केले आहे.(Karjat road potholes)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.