नवी दिल्ली: (PM Kisan Nidhi Scheme Eligibility Rules) देशातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे 'पीएम किसान सन्मान निधी योजना' राबवली जात आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना वर्षाला ६ हजार रुपयांची आर्थिक मदत ३ टप्प्यांत थेट बँक खात्यात दिली जाते. मात्र, केवळ शेतजमीन नावावर असल्यामुळे सर्वांनाच या योजनेचा लाभ मिळत नाही. सरकारने यासाठी कडक नियम, पात्रता आणि अपात्रतेचे निकष ठरवले आहेत. (PM Kisan Nidhi Scheme Eligibility Rules)
'हे' लोक पीएम किसान योजनेसाठी अपात्र; कोणाला मिळणार नाही लाभ?
पीएम किसानचा लाभ मिळवण्यासाठी शेतजमीन नावावर असणे अनिवार्य असले तरी काही घटकांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत असल्यास, अथवा काही महत्त्वाच्या सरकारी पदांवर कार्यरत/माजी कार्यरत असलेल्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळत नाही. आयकर भरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा कुटुंबाला या योजनेतून वगळण्यात आले आहे. काही विशिष्ट सरकारी पेन्शनचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींवरही या अपात्रतेचे नियम लागू होतात. (PM Kisan Nidhi Scheme Eligibility Rules)
चुकीची माहिती देऊन लाभ घेतल्यास पैशांची वसुली!
पीएम किसान योजनेचा अर्ज भरताना किंवा नोंदणी करताना जमीन, आधार, बँक खाते, उत्पन्न आणि कुटुंबाशी संबंधित माहिती अचूक देणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारी नोंदींच्या पडताळणीवेळी माहिती चुकीची किंवा बनावट आढळल्यास लाभार्थ्याचे नाव यादीतून तात्काळ वगळले जाते. एखाद्या व्यक्तीने अपात्र असूनही चुकीची किंवा खोटी माहिती देऊन या योजनेचे हप्ते लाटले असतील, तर मिळालेली संपूर्ण रक्कम सरकारकडून वसूल केली जाणार आहे. (PM Kisan Nidhi Scheme Eligibility Rules)
शेतकऱ्यांनी 'हे' काम करणे आवश्यक
शेतकऱ्यांनी वेळोवेळी आपली पात्रता आणि स्टेटस तपासणे गरजेचे आहे. शेतजमीन, आधार किंवा बँक खात्याच्या माहितीमध्ये काही बदल झाल्यास ते तातडीने अपडेट करून घेणे आवश्यक आहे. जर योजनेचा हप्ता जमा होत नसेल, तर शेतकऱ्यांनी अधिकृत पोर्टलवर स्टेटस तपासून संबंधित कृषी विभागाशी संपर्क साधावा. (PM Kisan Nidhi Scheme Eligibility Rules)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.