मिरा-भाईंदर, वसई-विरारमध्येही धर्मांतराच्या छुप्या कारवाया

शहरी भागांकडे ख्रिश्चन मिशनर्‍यांचा मोर्चा; ‘सकल हिंदू समाजा’चा आंदोलनाचा इशारा

    10-Aug-2026

Mira-Bhayander conversion

मिरा-भाईंदर, (Mira-Bhayander conversion):पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात धर्मांतर केल्यानंतर, ख्रिश्चन मिशनर्‍यांनी आता आपला मोर्चा शहरी भागांकडे वळवला आहे. वसई-विरार, मिरा-भाईंदर यांसारख्या शहरी भागांमध्ये ख्रिश्चन धर्मांतराचे प्रकार वाढल्याचा आरोप ‘सकल हिंदू समाजा’ने केला आहे.(Mira-Bhayander conversion)
 
भाईंदर पश्चिम येथील एका आजारी तरुणीला ‘बायबल वाचनाने आजार बरा होईल,’ असे आमिष दाखवून धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला. हिंदू देव-देवतांवरही आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने या परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.(Mira-Bhayander conversion)
 
मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर पश्चिम परिसरातील आंबेडकर नगर, उत्तन रोड भागात नियमित ख्रिस्ती प्रार्थना सभा चालवल्या जातात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही कार्यकर्ते स्थानिक हिंदू कुटुंबांच्या घरी जाऊन बायबल अभ्यासाची सत्रे घेत असून हिंदू धर्माविषयी अनुचित वक्तव्ये करत असल्याचे समोर आले. या प्रकाराला स्थानिकांनी आक्षेप घेतल्यानंतर वाद निर्माण झाला. याप्रकरणी भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची विनंती करण्यात आली आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने तत्काळ सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई न केल्यास, रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा ‘सकल हिंदू समाजा’ने दिला आहे.(Mira-Bhayander conversion)
 
दरम्यान, या तक्रारींची सत्यता पडताळून निष्पक्ष कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन मिरा-भाईंदर आयुक्तालयाकडून देण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा आणि पालघर या आदिवासी तालुक्यांमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या ख्रिश्चन मिशनरींच्या धार्मिक उपक्रमांना स्थानिक पातळीवर तीव्र विरोध होत आहे. त्यात सरकारने ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्या’ची अंमलबजावणी सुरू केल्याने बेकायदेशीर धर्मांतराला चाप बसला आहे. परिणामी, ख्रिश्चन मिशनर्‍यांनी आता आपला मोर्चा वसई-विरार आणि मिरा-भाईंदर या शहरी भागांकडे वळवला आहे.(Mira-Bhayander conversion)
 
मिरा-भाईंदरमध्ये ‘लव्ह जिहाद’च्या एका प्रकरणात ‘सकल हिंदू समाज’ व पोलीस प्रशासनात तेढ निर्माण झाली होती. पोलीस प्रशासन अपराध्यांना पाठीशी घालत ‘सकल हिंदू समाजा’च्या कार्यकर्त्यांवर कारवाई करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. शेवटी ‘सकल हिंदू समाजा’च्या मागण्या पोलीस प्रशासनाने मान्य केल्या. आता वाढत्या ख्रिश्चन धर्मांतरामुळे ‘सकल हिंदू समाज’ जागा झाला आहे.(Mira-Bhayander conversion)
 
‘शाहरुख’ बनला ‘महेंद्र चंद्रावत’;
 
लग्नाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार असून, पुण्यातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत अभियंता म्हणून काम करते. २०२५ मध्ये कंपनीसमोरील आरोपीच्या कॅफेमध्ये तिची शाहरुख बेगशी ओळख झाली. मात्र, आरोपीने आपले नाव ‘महेंद्र चंद्रावत’ असल्याचे सांगत, आपण हिंदू युवक असल्याचे भासवले. तरुणीच्या तक्रारीनुसार, आरोपीने खरी धार्मिक ओळख लपवून तिच्याशी मैत्री केली. लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तरुणीच्या मोबाईल फोनसह ‘फोन-पे’, बँक खाते आणि ऑनलाईन बँकिंगशी संबंधित माहिती मिळवली. तिच्या खात्यांमधून विविध माध्यमांतून सुमारे सात ते आठ लाख रुपये काढले. शिवाय, तिच्या नावावर मोबाईल फोनचे कर्जही काढले.(Mira-Bhayander conversion)
 
पैसे मागायला गेली, धमकी मिळाली!
 
या कर्जाचा हप्ता थकल्यानंतर बँकेकडून तरुणीला फोन आला. त्यानंतर तिने आपल्या बँक खात्यांतील व्यवहार तपासले असता, मोठ्या प्रमाणावर रक्कम परस्पर काढण्यात आल्याचे तिच्या निदर्शनास आले. आपले पैसे परत मिळावेत, यासाठी तरुणी दि. १७ मे रोजी मध्य प्रदेशातील देवास येथे गेली होती. मात्र, आरोपीने पैसे परत करण्याऐवजी तिला धमकावले. यानंतर तरुणीने कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला आणि दि. ७ ऑगस्ट रोजी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तरुणीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शाहरुख बेग याच्याविरुद्ध बलात्कार, फसवणूक आणि अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे प्रभारी अमित सोलंकी यांनी आरोपी मूळचा देवासचा रहिवासी असून पुण्यात कॅफे चालवत असल्याची माहिती दिली.(Mira-Bhayander conversion)
 
 




संबंधित मजकूर